May 20, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात एमसीए अ संघाचे वर्चस्व

पुणे, दि. 23 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज साहिल मदार(8-16)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमसीए अ संघाने केडन्स संघाविरुद्ध पहिल्या डावात 120 धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले.

विराज क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी एमसीए अ संघाच्या साहिल मदार 8-16, कपिल पवार 1-7, आदिनाथ प्रभालकर 1-18)यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे केडन्स संघाचा डाव 24.5 षटकात सर्वबाद अवघ्या 55धावावर धावांवर कोसळला. यात मोहम्मद अरकम सय्यद 18, मोहित कटारिया नाबाद 12 यांनी थोडासा प्रतिकार केला. याच्या उत्तरात एमसीए अ संघाला 32.3 षटकात सर्वबाद 175धावापर्यंत मजल मारता आली. यात आयुष रक्ताडेने 39चेंडूत 9चौकार व 3 षटकारासह 60धावा, अभिनंदन गायकवाडने 32धावा, सुमित अहिवळेने 55धावा, पुष्कर अहिररावने 16 धावा केल्या. केडन्सकडून मोहम्मद अरकम सय्यद(5-51), इशान लोया(2-7), निलय शिंगवी(1 -39) यांनी सुरेख गोलंदाजी केली. एमसीए अ संघाने केडन्स संघाविरुद्ध पहिल्या डावात 120 धावांची आघाडी घेत त्यांच्यावर फॉलोऑन लादला.

दुसऱ्या डावात केडन्स संघाने आज दिवसअखेर 30 षटकात 7बाद 105धावा केल्या. यात तनिष्क खेडकर 29, मोहम्मद अरकम सय्यद 29, अनुज साळवी 24, सोनील पिसे नाबाद 5, पार्थ कांबळे नाबाद 1धावांवर खेळत आहे. एमसीएकडून समेक जगताप(3-23), आफताफ शेख(2-27) यांनी अचूक गोलंदाजी केली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
पहिला डाव: केडन्स: 24.5 षटकात सर्वबाद 55धावा(मोहम्मद अरकम सय्यद 18, मोहित कटारिया नाबाद 12, साहिल मदार 8-16, कपिल पवार 1-7, आदिनाथ प्रभालकर 1-18) वि.एमसीए अ: 32.3 षटकात सर्वबाद 175धावा(आयुष रक्ताडे 60(39,9×4,3×6), अभिनंदन गायकवाड 32(38,5×4), सुमित अहिवळे 55(73,8×4), पुष्कर अहिरराव 16, मोहम्मद अरकम सय्यद 5-51, इशान लोया 2-7, निलय शिंगवी 1 -39); एमसीए अ संघाकडे पहिल्या डावात 120 धावांची आघाडी;

दुसरा डाव: केडन्स: 30 षटकात 7बाद 105धावा(तनिष्क खेडकर 29, मोहम्मद अरकम सय्यद 29, अनुज साळवी 24, सोनील पिसे नाबाद 5, पार्थ कांबळे नाबाद 1, समेक जगताप 3-23, आफताफ शेख 2-27) वि.एमसीए अ: