October 5, 2024

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची शिंदे फडणवीसांना संधी; अन्यथा विधानसभेला सरकार पाडू – मनोज जरांगे पाटील यांचा पुण्यातील सभेत इशारा

पुणे, ११ आॅगस्ट २०२४ : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन या समाजाचे भलं करण्याची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे आहे. तुम्ही निर्णय घ्या नाहीतर हे सरकार पाडायची हिम्मत आमच्यामध्ये आहे. पुण्यामध्ये लाखो मराठा जमले आहेत, त्यामुळे आता मराठा शांत बसणार नाही. येत्या विधानसभेत आपल्याला कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे ठरवायचे आहे. यासाठी २९ ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. त्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट केली जाईल असा इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात दिला.

मराठा आरक्षणासाठी जनजागृती आणि शांतता रॅली काढली जात आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज पुण्यात त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. सकाळपासून पुण्यामध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ११ वाजता त्यांची रॅली सुरू होणार होती. मात्र कात्रज पासून सारसबागेपर्यंत येण्यासाठी जरांगे पाटील यांना चार तास लागले. संध्याकाळी चार नंतर रॅलीला सारसबागेतून सुरुवात झाली, तेथून शनिवार वाडा, एसएसपीएम शाळा, जंगली महाराज रस्ता येथून डेक्कन कॉर्नरला खंडोजी बाबा चौकात लाखो मराठ्यांच्या उपस्थितीमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन केले. तसेच मराठा उद्योजकांना साथ द्या, व्यवसायांना साथ द्या असेही आवाहन त्यांनी केले. मात्र त्याच वेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, नारायण राणे देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागून नका, नाही तर तुमचा कार्यक्रम करू. पुण्यातील गर्दी पाहून अर्ध मंत्री मंडळ झोपणार नाही. त्यांच्यात जुळून घेऊ अस म्हणतील. मराठा समाजाच्या बळावर लढत आहे. हाताला सलाईन आणि कंबरेला पट्टा आहे. दोन- तीन महीने त्रास सहन करा, आपली सत्ता आल्यास आरक्षण मिळणारच आहे.
मला, बदनाम आणि एकट पडण्याचा प्रयत्न केला, माझी दोन स्वप्न आहेत, माझा समाज आणि त्यांची लेकरं मोठी करायची आहेत. विरोधकांना दुःख आहे, मी फुटत नाही. आता हे सर्व जण म्हणतायत मुंबई ला एक चक्कर मारायची आहे.

मी बोलायला लागल्यास दोन- दोन लिटर पाणी पितात, मी मान- सन्मान करतो आहे, त्यांना आणखी एक संधी देतो, त्यांनी बोलू नये, अन्यथा त्यांना प्रत्युत्तर देईल. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर हे देखील आपले कार्यकर्ते झाले आहेत, त्यांनी तिथली दुसरी गोळी देऊ नये, ते देखील आता एक मराठा लाख मराठा म्हणतायत. मेलो तर चालेल मला जात महत्वाची आहे, समाज महत्वाचा आहे. या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, शेवटपर्यंत जगायचं तर वाघ म्हणून जगायचे आहे. आज पहाटे बातम्या येतील मंत्री मंडळी धुसपुस सुरू झाली. पुण्यातील ही ताकद बघूनजे जे विरोधात बोलले ते आता पडलो असेच समजा.

ज्या मंत्र्याला- नेत्याला तुम्ही मोठं केलं तो त्याच्या पक्ष्याला बाप म्हणत आहे. अशा व्यक्तींना मोठं करू नका. समाज हित पाहणारे आता नेते पाहिजेत. पुण्यातील कडवट आणि कट्टर पणा याचा आदर्श मराठा बांधवांनी देश आणि जगासमोर ठेवला आहे.

राजकारण्यांना इतकं मोठं केलं आहे, त्यांच्या वीस पिढ्या बसून खातील. भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन, तेलगी घोटाळा केला, मराठा आरक्षण भुजबळ यांनी खाल्लं आहे. भुजबळ हे मराठ्याने मोठं केलं आणि आता त्यांच्याच अन्नात विष कालवत आहेत.

महाराष्ट्रातील मराठ्यांना आवाहन आहे, घरात बसू नका, बाहेर पडा. मराठ्यांनो ताकदीने एकवट व्हा आपल्याला जात आणि आपली लेकर मोठी करायची आहेत.

नुकसान झालं तर चालेल पण एक दिवस आंदोलनात सहभागी व्हा. देवेंद्र फडणवीस यांनी समन्वयक फोडले, आज जात संकटात असताना तुम्ही सरकारच्या सोबत उभे राहात आहेत. मराठा समाजातील प्रत्येक घटकाला जाणीवपूर्वक लक्ष केलं जातं असून त्यांना त्रास दिला जात आहे. मराठा अधिकाऱ्यांची बढती होत नाही.

राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधले नेते आरक्षणा विरोधात बोलत आहेत. छगन भुजबळ एकटा आहे, पण ते आरक्षणाला विरोध करत आहेत. २९ ऑगस्टला अंतरवाली येथे एक बैठक ठरवली आहे. पाडायचे आणि उभे करायचे यावर ठरवू, पाडण्यात खूप मजा आहे,
-आगामी विधानसभेत बरेच जण पडणार आहेत. ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे. त्यांना निवडून येऊ देणार नाही. आता गाफील राहू नका. मरे पर्यंत इमानदारी विकत नाही. अनेक जण फुटले, आता त्यांच्या कडे एकच पर्याय आहे, गोळ्या घालून मारून टाकणे, जो गोळ्या घालेल त्याची मराठा त्यांची जात महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही.

-समाजाच्या शक्तीपूढे कुठलीच सत्ता टिकत नाही. एक थेंब ही रक्ताचा सांडू द्यायचा नाही. एकदाच झालं, अंतरवाली सराटीत, देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलं. सगे सोयऱ्याचे अंमलबजावणी झाल्यास आपल्याला आरक्षण मिळालं समजा, ७० टक्के आरक्षण मिळवत आणलं.

पुण्यातील मराठ्यांची एक एकजूट मुंबई आणि आता दाखवली. मुंबई ला जायचं नको आता, की जायचं?एकदा जायचं का?, थोडं, थोडं जाऊ.

एक वर्ष झालं आमचा लढा सुरू आहे. संयमाने सुरू आहे. किती दिवस अन्याय सहन करायचा? २९ तारखेला पाडायचं किंवा उभं करायचं ठरवलं. मराठा समाजात खूप उमेदवार आहेत. माझ्या गाडीत सहा आहेत, जात मोठी करण्यासाठी आपल्याला राजकारणात जायचं आहे. इच्छुक असू द्या, पण स्वार्थासाठी नाही तर जातीसाठी काम करायचं आहे. सर्वांनी उभा करणाऱ्याला निवडून आना. बाकीचे उभा राहल्यास तो राजकारणासाठी सोबत होता अस समजा.

बीड जिल्ह्यात ही अशीच म्हणतायत, ह्यांना पाडा, मुस्लिम समाज तर आपल्या पुढे आहेत. बारा बलुतेदार सोबत आले तर यांचा कार्यक्रम ठरला. मराठा समाजाने १०० टक्के मतदान करा. राजकारणी हे खूप हुशार आहेत. तीर्थ यात्रेला नागरिकांना घेऊन जातात. तोपर्यंत आपलं सीट पडतं, यावेळी सर्वांनी मतदान झाल्याशिवाय जाऊ देऊ नका. विरोधकांसोबत राहा, खा त्याचाच सोबत राहा, पण त्याला पाडा, मराठे नेते सर्व व्यसपीठावर होते तरी ते पडले. मराठा हा पैशांसाठी काम करत नाही. पाडायचं ठरलं तर नाव सांगू., अनेकांना त्यांनी पाडलं.
गिरीश महाजन म्हणतायत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही, त्यांच्या मतदार संघात १ लाखापेक्षा अधिक मतदान आहे. परळीत तर येतच नाही, येऊच देणार नाही. मराठ्याच्या त्यांनी त्रास दिला, मी बदला घेणार. कोकण, विदर्भ, खानदेश येथील सर्व उमेदवार पडणार.
मुंबई त उमेदवार पांडण आणि उभा करणं अवघड आहे. पण,१९ ठिकाणी आपलं सर्वेक्षण केलं आहे.

मला जिवंत मारलं तरी ओबीसींमधून आरक्षण घेणारच. समाजची मान खाली होऊ देणार नाही. समाजाशी गद्दारी करणार नाही. मुख्यमंत्र्यांना मागणी करतोय, इ़्ब्ल्यूएसच आरक्षण पुन्हा परत द्या. तुम्हाला आमच्या मुलांच वाटोळं करण्याचा अधिकार नाही. अन्यथा तुमच सरकार पडणार.
सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, सरसकट गुन्हे मागे घ्या, मराठ्यांची पोट जात ही कुणबी म्हणून जाहीर करा, अन्यथा हे सरकार पडणार. पाडायचं की उभं करायचं हे २९ ऑगस्ट ठरणार आहे, एक इंच ही मागे सरकणार नाही. या सरकार आणखी एक संधी आहे. या मागण्या पूर्ण न केल्यास हेच मराठे एक ही उमेदवार निवडून येऊ देणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस यांची सर्व षड्यंत्र तोडण्याची ताकद माझ्यात आहेत. सर्व षड्यंत्र हणून पाडले आहे. ह्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन मी आरक्षण मिळणार आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत. ओबीसी आणि मराठ्यांनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नका. जगात मी नसलो तर मराठा समाज फुटू देऊ नका, असे जरांगे पाटील म्हणाले.