पुणे, २६ सप्टेंबर २०२४ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑक्टोबर महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ ऑक्टोबर, मंचर येथे ७ व ८ ऑक्टोबर, जुन्नर येथे १४ व १५ ऑक्टोबर, वडगाव मावळ येथे २१ व २२ ऑक्टोबर तर लोणावळा येथे २८ व २९ ऑक्टोबर या दिवशी पक्क्या अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान