पुणे, दि. २४/०९/२०२३: महानगरपालिकेसमोर बेकायदेशीर जमाव जमवून चिथवाणी देणारी भाषणे करून समाजात जातीय तेढ निर्माण केल्याची घटना ४ सप्टेंबरला घडली होती. याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह पुण्यश्लोक पुनर्निर्मिती समिती अध्यक्ष कुणाल सोमेश्वर कांबळे, किरण चंद्रकांत शिंदे ,विशाल दिलीप पवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर मंदिराजवळील मशिदीवरून वाद सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोपींना ४ सप्टेंबरला पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्याची परवानगी नव्हती. मात्र, तरीही आरोपी कुणाल कांबळे आणि मिलिंद एकबोटे यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारी भाषणे केली गेली. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने संंबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर तज्ञांचा सल्ला घेतल्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचे सांगितले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी आईवळे तपास करत आहे.

More Stories
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या
महापालिकेची मालमत्ता पुढाऱ्यांची जहागीरीसाठी २६ वर्षे जुना निर्णय रद्द