पुणे, दि.११/०८/२०२३- तरुणावर हत्यार उगारून त्याला मारण्याची धमकी देत परिसरातील वाहनांची तोडफोड करणार्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ ऑगस्टला रात्री सव्वा अकराच्या सुमारास विमाननगरमध्ये घडली होती.
प्रसाद संपत गायकवाड ( वय २५ रा. वडगाव शेरी), अरबाज आयुब पटेल (वय २४, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेहनाज शेख (वय ४६ रा. विमाननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेहनाज हे ९ ऑगस्टला घरी असताना टोळके त्यांच्या घरी गेले. तुमचा भाचा कुठे आहे, त्याला आज सोडणार नाही असे म्हणत घरातील लोकांना शिवीगाळ केली. शेहनाजचा मुलगा शाहरूखला हाताने मारहाण केली. त्यानंतर शेहनाजवर हत्यार उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेउन त्यांना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी सांगितले आहे.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ