December 2, 2023

पुणे: रिलेशनशिप मध्ये रहा अन्यथा, हातपाय तोडून टाकीन, तरुणीला जीवे मारण्याची तरुणाकडून धमकी

पुणे, ११/०८/२०२३: एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून, तिच्यावर एका तरुणाने पाळत ठेवली. संबंधित तरुणीला वारंवार त्रास देऊन मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहा. नाही आली तर तुझे हातपाय तोडून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी तरुणानी दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुशांत विलास जाधव (राहणार -बाणेर ,पुणे )या आरोपी विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित तरुणीने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2019 ते आत्तापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशांत जाधव हा तक्रारदार तरुणीच्या ओळखीचा आहे. संबंधित तरुणी ही कामावर जात असताना, तिचा आरोपी सातत्याने पाठलाग करत होता. तसेच तिच्यावर पाळत ठेवून ती बाणेर इथून गोखलेनगर येथे रिक्षाने जात असताना, तिच्या हाताला पकडून त्याच्याजवळ ओढून त्यानी तिच्या मनाला लज्जा निर्माण केली. तसेच तिला वारंवार फोन करून ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे ,तू रिलेशनशिप मध्ये ये नाहीतर, तुझे हातपाय तोडून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस कोळी पुढील तपास करत आहे.