पुणे, दि. १०/०७/२०२३: बंद फ्लॅटचे कुलूप तोडून साडेसात लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरणार्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना २६ जून ते ८ जुलै कालावधीत मांगडेवाडी परिसरात घडली होती.
शुभम अशोक माने (वय २१, रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिया कांबळे (वय ३०) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया कुटूूंबियासह मांगडेवाडीत राहायला आहेत. २६ जून ते ८ जुलै कालावधीत त्या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घरामध्ये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते. दरम्यान, बंद फ्लॅटचे कुलूप तोडून शुभम माने याने १३ लाखांवर ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी तक्रार दाखल होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपास करुन चोरट्याचा शोध घेत अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ