पुणे, १६ एप्रिल २०२६ : महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दिलासा देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. नूतनीकरणासाठी ठरविण्यात आलेली मुदत वाढविण्याबरोबरच परवाना शुल्क भरण्यासाठीही अतिरिक्त कालावधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी यापूर्वी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे अनेकांना या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परवाना शुल्क भरण्यासाठीही वाढीव मुदत लागू राहणार आहे.
फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, प्रशासनाकडून नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत. दरम्यान, मुदतवाढीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी नोंदणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी