March 24, 2025

पुणे: पोलीस निरीक्षकांचे फेसबुक हॅक अन पुतणीची फसवणूक, सायबर चोरट्याचा महिलेला ७० हजारांचा गंडा

पुणे, दि. २७/०७/२०२३: पोलीस निरीक्षकांचा फेसबुक मेसेंजर हॅक करून सायबर चोरट्याने महिलेला तब्बल ७० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १९ ते रोजी हडपसर परिसरात घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांनी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी (रा. खराडी ) यांचे फेसबुक मेसेंजर हॅक केले. त्यानंतर फिर्यादी पुतणीला ते स्वतः मेसेज करीत असल्याचे भासविले. त्यांचा विश्वास संपादित करुन सायबर चोरट्याने महिलेला तब्बल ७० हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप शिवले तपास करीत आहेत.