April 29, 2024

पुणे: रेड्सियर फाउंडेशन आणि प्राईम अकॅडमी तर्फे मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत जेईई प्रशिक्षण

पुणे, १५ फेब्रुवारी २०२४: प्राईम अकॅडमी पुणे आणि रेड्सियर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय समाजातील पात्र विद्यार्थ्यांना जेईई परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेईई मार्फत अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या आयआयटी मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आयआयटीयन बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

रेड्सियर फाउंडेशनच्या विश्वस्त पूजा शर्मा यांनी सांगितले, “अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आयआयटी मध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र ते काही अडचणींमुळे शक्य होऊ शकत नाही. रेड्सियर फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला असून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.”

प्राईम अकॅडमी पुणे येथील शैक्षणिक प्रमुख तथा प्रसिद्ध भौतिकशास्त्र लेखक डी सी पांडे यांनी मागासवर्गीय समाजातील जे विद्यार्थी यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्या पालकांच्या आव्हानांवर प्रकाश टाकला. अशा विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार, समाज, रेड्सियर फाउंडेशन आणि प्राईम अकॅडमी सारख्या संस्था यांच्यातील सहयोगी प्रयत्नांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

या उपक्रमामध्ये इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदवण्यासाठी ‘PRAT’ (प्राईम रेड्सियर ॲप्टीट्यूड टेस्ट) देणे बंधनकारक आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता दहावीतील गणित आणि विज्ञानातील प्रश्न विचारले जातील. जे या टेस्ट मधून पात्र ठरतील त्यांना विज्ञान कार्यशाळेत आणि त्यानंतरच्या परीक्षेत सहभागी होण्याची संधी असेल. यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीही पर्याय उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या दिवसांमध्ये विविध स्लॉट उपलब्ध आहेत. ज्याच्यामुळे सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.

प्राईम अकॅडमी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील प्रतिभा जोपासून त्यांना मार्गदर्शन करत आहे. जेईई परीक्षेत राखीव श्रेणीत प्राईम अकॅडमीचा विद्यार्थी संपूर्ण भारतात प्रथम असतो. सन 2016ची जेएनव्ही बॅच 100 टक्के जेईई उत्तीर्ण झाली. अकॅडमीच्या गुणवत्ता पूर्ण कामगिरीमुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून अकॅडमीला मान्यता देखील मिळाली आहे.

ह्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://forms.gle/FxvuqcHasPz9y1pHA या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. तसेच अधिक माहितीसाठी www.primeacademypune.com या प्राईम अकॅडमीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच 8928382838 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.