पुणे, २२/०७/२०२३: लष्कर भागातील एका कपडे विक्री दुकानात खरेदी करणाऱ्या तरुणीशी अश्लील कृत्य करणाऱ्या कामगाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका २० वर्षीय तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कैफ कलीम मुल्ला शेख (वय २४, रा. खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी महात्मा गांधी रस्त्यावरील अशोक विजय काॅम्प्लेक्समध्ये टीशर्ट खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी तरुणीला टीशर्ट दाखविण्याचा बहाणा केला. टीशर्ट परिधान करणाऱ्या तरुणीशी शेख याने अश्लील कृत्य केले. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. शेखविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.
More Stories
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस चांगला प्रतिसाद