पुणे, दि. १६/०८/२०२३: तरूणावर खुनी हल्ला करणार्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही घटना १३ ऑगस्टला पाषाण सर्कल परिसरात घडली आहे.
चेतन शशिकांत गोटेकर (वय १८ रा. पाषाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. श्रीराम नरसराज मुप्पाला (वय ३०) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रवी राठोड (वय ३९ रा. रामनगर, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रवी हे १३ ऑगस्टला भाजी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाषाण सर्कल परिसरात त्यांचे मित्र श्रीरामला दोघांनी अडवून शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याच्या हेतूने तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला खलास करतो असे धमकावून हत्याराने डोक्यात आणि पाठीवर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव तपास करीत आहेत.

More Stories
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या
महापालिकेची मालमत्ता पुढाऱ्यांची जहागीरीसाठी २६ वर्षे जुना निर्णय रद्द