October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: शिवीगाळीची विचारपूस केल्यामुळे एकावर वार, दत्तवाडीतील घटना

पुणे, दि. ६/०९/२०२३: शिवाीगाळ केल्याची विचारपूस केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना ५ सप्टेंबरला दत्तवाडी परिसरात घडली आहे.

याप्रकरणी बल्ली वाघमारे, गणेश वाघमारे यांच्यासह इतरांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर गायकवाड (वय २४, रा. दत्तवाडी) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर आणि त्याचे मित्र दत्तवाडी परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टोळक्यातील बल्ली आणि गणशने त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे मयूरने त्याला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी मयूरला बेदम मारहाण करीत त्याच्यावर शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.

अझर आणि त्यांचा मावस भाऊ सलमान खान कोंढवा येथून अप्पर बिबवेवाडी येथील घरी जात होते. त्यावेळी संगम हॉटेल येथे ते पार्सल घेण्यासाठी थांबले होते. त्याचठिकाणी पार्सल घेण्यासाठी आरोपी मुलगा थांबला होता. रस्त्यातून जात असताना अझरचा त्याला धक्का लागल्याने त्याने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्याच्या दोन साथीदारांनी अझरच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत होते. हल्लेखोरांनी अझरच्या पोटरीवर व खांद्यांवर वार करुन गंभीर जखमी केले.त्यांचा मित्र सलमान शेख हा भांडणे सोडविण्यासाठी आला असताना त्याच्यावरही शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले.

रिक्षामध्ये बसून हाताने शस्त्रे हवेत फिरवत शिवीगाळ, आरडाओरड करुन अप्पर डेपोच्या दिशेने निघून केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.