October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: गांजाची तस्करी करणारा रेल्वे प्रवासी अटकेत – १६ किलाे गांजा जप्त

पुणे, ०८/०९/२०२३: रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक लाख ६७ हजार रुपयांचा १६ किलो गांजा जप्त करण्यात आला.

रुद्रराज कोंडाबाबू धुबरु (वय २० रा. उराडा, ता. हुकूमपेठा, विशाखपट्टणम, आंध्रप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी रुद्रराज काकीनाडा एक्सप्रेस रेल्वेगाडीतून निघाला होता. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत गांजा होता. दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यातील ओंकार कुभरे यांनी दौंड रेल्वे स्थानकात रुद्रराजच्या संशयित हालचाली टिपल्या. संशयावरुन त्याची चाैकशी सुरू करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत आठ पाकिटे सापडली. पाकिटाची तपासणी करण्यात आली. तेव्हा पाकिटात गांजा सापडला. त्यानंतर कुभरे यांनी रेल्वेतील तिकिट निरीक्षकांच्या ताब्यात त्याला दिले.

रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकात आली. तेव्हा त्याला पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याकडून १६ किलो ७१४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधीक्षक महेश दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, बाळासाहेब अंतरकर, झोंडगे, ओंकार कुभरे, इनामदार, शीतल सांगवे, कोमल शेजाळ, पूजा धाकतोडे आदींनी ही कारवाई केली.