October 6, 2026

Pune University: कुलगुरूंची रिफॅक्टरीला अचानक भेट, जेवणाचा दर्जा, स्वच्छतेची केली पाहणी

पुणे, ३० सप्टेंबर २०२६ : विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा आणि भोजनालयातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी कुलगुरूंनी आज रिफॅक्टरी भोजनालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी भोजनालयाची पाहणी करण्यासोबतच स्वतः जेवण करून अन्नाच्या दर्जाची प्रत्यक्ष पडताळणी केली.

कुलगुरूंसोबत अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता प्रा. प्रभाकर देसाई यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरूंनी भोजनालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, कच्चा माल साठविण्याची पद्धत तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. अन्नधान्य व इतर साहित्य योग्य दर्जाचे आणि सुरक्षित वातावरणात साठविले जाते की नाही, याचीही त्यांनी तपासणी केली.

यानंतर त्यांनी भोजनालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून दररोज मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा, मेनू आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांचा थेट अभिप्राय जाणून घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने भोजनाचा दर्जा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित व्यवस्थापनाला दिल्या.