July 22, 2024

पुणे: चंदननगरमध्ये भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे, दि. २०/०८/२०२३: रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी भर दुपारी महिलेच्या गळ्यातील ७ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंदननगरमधील संघर्ष चौकात घडली. यापकरणी माया शिंदे (वय ५०, रा. लोहगाव) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया लोहगाव परिसरात राहायला असून कामानिमित्त चंदननगरमधील संघर्ष चौकातून रस्त्याने जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. मायाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक अरिंवद कुमरे तपास करीत आहेत.