पुणे, १३ ऑगस्ट २०२३: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पूर्वा वलवंडे, सफा शेख, आयुशी काळे, प्राजक्ता गायकवाड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत पूर्वा वलवंडेने हृदय साळवीचा 15-9, 15-11 असा तर, सफा शेखने एस दखाणेचा 15-12, 15-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. आयुषी काळेने हर्षिता पाटीलवर 15-10, 15-10 असा विजय मिळवला. प्राजक्ता गायकवाडने प्राची शितोळेचे आव्हान 15-12, 15-6 असे संपुष्टात आणले.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत विहान मूर्तीने .वात्सल्य गर्गचा 15-13, 13-15, 15-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. आदित्य पाटीलने अवनीश बांगरला 15-11, 17-15 असे नमविले. अभिज्ञान सिंघाने अंशप्रीत मंदरचा 15-7, 15-11 असा तर, स्वानंद पाटणेने दिव्यांश सिंगचा 15-8, 15-13 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
13 वर्षांखालील मुलींच्या गटात पद्मश्री पिल्लई, श्रावणी आर्डे, ऋषिका रसाळ, इशानवी काळे, शर्वरी सुरवसे, सई चपले, समन्वया धनंजय यांनी, तर मुलांच्या गटात समीहान देशपांडे, विहान कोल्हाडे, दिवित मुथा, अन्वय समग, सौरिश काणे, इशान मुलांगे, रिशान हंसदा, आर्यन भोसले, विवान भाटिया, जतीन सराफ तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 13 वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
समीहान देशपांडेवि.वि.अप्रतिम मुखर्जी 15-0, 15-3
विहान कोल्हाडे वि.वि.अतिक्ष अग्रवाल 15-5, 15-12;
दिवित मुथा वि.वि.निधीश बकावळे 15-13, 12-15, 15-5
अन्वय समग वि.वि.अरहम मुंडे 15-4, 15-7;
सौरिश काणे वि.वि.वेदांत तांदळे 7-15, 15-6, 15-9
इशान मुलांगे वि.वि.अधृत सिद्धार्थ 15-12, 16-14
रिशान हंसदा वि.वि.अद्वय देशमुख 15-8, 11-15,15-6
आर्यन भोसले वि.वि.जीवराज पाटील 15-12, 15-9
विवान भाटिया वि.वि.वेद रेड्डी मल्लू 15-12, 16-14;
जतीन सराफ वि.वि.कियाांश शर्मा 15-8, 15-6;
13 वर्षांखालील मुली:
पद्मश्री पिल्लई वि.वि.अपूर्वा घोळवे 15-11, 15-9;
श्रावणी आर्डे वि.वि.कायरा रैना 18-16, 15-7;
ऋषिका रसाळ वि.वि.आरोही देसाई 16-14, 14-16, 15-13
इशानवी काळे वि.वि.रिया चोपडा 14-16, 15-13, 15-8;
शर्वरी सुरवसे वि.वि.शर्वरी वरवंतकर 15-4, 15-3;
सई चपले वि.वि.रिद्धिमा पवार 15-13, 16-14;
समन्वया धनंजय वि.वि.शुभ्रा कुलकर्णी 15-10, 15-6;
15 वर्षांखालील मुले:
अभिग्यान सिंघा वि.वि.अक्षर झोपे 15-3, 15-10;
सलील मणेरी वि.वि.अनय एकबोटे 15-8, 15-9;
समीहान देशपांडे वि.वि.रणवीर दाभोलकर 15-11, 15-8;
केतन रोंगे वि.वि.वेदांत तांदळे 15-13, 5-15, 15-13
विहान मूर्ती वि.वि.हर्षिल शुक्ला 15-4, 15-4;
ओम दरेकर वि.वि.अजिंत्य जोशी 11-15, 15-6, 15-10
आयुष पाटील वि.वि.वत्सल तिवारी 15-10, 16-18, 15-7
वरद लांडगे वि.वि.अंशप्रीत मंदर 15-8, 15-12;
15 वर्षांखालील मुली:
पद्मश्री पिल्लई वि.वि.रिद्धिमा जोशी 15-9, 15-10;
शर्वरी सुरवसे वि.वि.अनन्या आलासे 15-3, 15-4;
संस्कृती जोशी वि.वि.साई गोसावी 15-7, 15-5;
अभिज्ञा ठोंबरे वि.वि.सिद्धी जगदाळे 15-9, 15-11;
लाभा मराठे वि.वि.पवनी मुळे 15-6, 15-4;
नाविका जैन वि.वि.तेजस्वी भुतडा 19-17, 15-10;
सफा शेख वि.वि.वेदिका श्रीवास्तव 15-2, 15-6;
17 वर्षांखालील मुले:
अभिज्ञान सिंघा वि.वि.अंशप्रीत मंदर 15-7, 15-11
स्वानंद पाटणे वि.वि.दिव्यांश सिंग 15-8, 15-13
वरद लांडगे वि.वि.असीम श्रोत्रिया 15-7, 15-6
चैतन्य परांडेकर वि.वि.अगस्त्य पवार 15-4, 15-7;
आदित्य पाटील वि.वि.अवनीश बांगर 15-11, 17-15
विहान मूर्ती वि.वि.वात्सल्य गर्ग 15-13, 13-15, 15-7
17 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
पूर्वा वलवंडे वि.वि. हृदय साळवी 15-9, 15-11
सफा शेख वि.वि.एस दखाणे 15-12, 15-7;
आयुषी काळे वि.वि.हर्षिता पाटील 15-10, 15-10;
प्राजक्ता गायकवाड वि.वि.प्राची शितोळे 15-12, 15-6;
More Stories
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर माफीचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील सर्व सोसायट्यांचा वीजपुरवठा पूर्ववत
‘नृत्यसाधकांनी पूरक विज्ञानमितीही शोधाव्यात’, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे आवाहन