पुणे, दि.27 मे 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
पीवायसी मैदानावरील लढतीत यश अधिकारी(2-41 व 25धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीवायसी संघाने केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाचा 2 गडी राखून पराभव करत पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने 45षटकात 8बाद 234धावा केल्या. यात आर्यन वाकडे नाबाद 74, आयुष शर्मा 35, श्लोक चव्हाण 31, प्रणव शिंदे 28, ऋतुराज शेवाळे 22 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून रुहुल्ला नदाफ(2-25), यश अधिकारी(2-41), यथार्थ पडळकर(1-35) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान पीवायसी संघाने 42षटकात 8बाद 237धावा करू पूर्ण केले. सलामवीर अथर्व वैद्यने 104चेंडूत 10चौकाराच्या मदतीने 74 धावांची संयमी खेळी केली. त्याला ओम सानपने 30 धावा करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 45चेंडूत 50धावांची भागीदारी केली. त्यानंतर यश अधिकारी 25, सोमेश सामंद नाबाद 31, शिवम दिवेकर नाबाद 18 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
शिंदे हायस्कूल मैदानावरील सामन्यात हर्षवर्धन नरवटे(2-23 व नाबाद 51) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने झोराष्ट्रियन्स संघाचा 5गडी राखून पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
आर्यन्स क्रिकेट मैदानावरील लढतीत गणेश बाड(6-24) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने विलास क्रिकेट क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
पीवायसी मैदान:
केदार जाधव क्रिकेट अकादमी: 45षटकात 8बाद 234धावा(आर्यन वाकडे नाबाद 74(63,10×4,1×6), आयुष शर्मा 35(57,3×4,1×6), श्लोक चव्हाण 31(24,4×4,1×6), प्रणव शिंदे 28, ऋतुराज शेवाळे 22, रुहुल्ला नदाफ 2-25, यश अधिकारी 2-41, यथार्थ पडळकर 1-35) पराभूत वि. पीवायसी: 42षटकात 8बाद 237धावा(अथर्व वैद्य 74(104, 10×4), ओम सानप 30, यश अधिकारी 25, सोमेश सामंद नाबाद 31, शिवम दिवेकर नाबाद 18, श्लोक चव्हाण 3-42, यशराज शिंदे 2-43);सामनावीर – यश अधिकारी; पीवायसी 2गडी राखून विजयी;
शिंदे हायस्कूल मैदान:
झोराष्ट्रियन्स: 37.5षटकात सर्व बाद 174धावा(विश्वजीत जगताप 46(81,6×4), ओंकार मोगल 24, श्रेयस गायकवाड 17, जय दानवले 17, प्रेमराज जगदाळे 16, यश हाळे 3-23, श्रीनिवास गाडे 3-48, हर्षवर्धन नरवटे 2-23, आधार सावंत 2-36) पराभूत वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 30.5षटकात 5बाद 177धावा(हर्षवर्धन नरवटे नाबाद 51(60,8×4,1×6), प्रद्युम्न धोंड नाबाद 41(42,3×4,3×6), आराध्य सिंग 29, अभय गुट्टे 20, ओंकार मोगल 2-47, क्षितिज मोरेगावकर 1-28); सामनावीर – हर्षवर्धन नरवटे; क्लब ऑफ महाराष्ट्र 5 गडी राखून विजयी;
आर्यन्स क्रिकेट मैदान:
विलास क्रिकेट क्लब: 34.3षटकात सर्वबाद 167 धावा(शौर्य पाटील 32(20, 2×4,3×6),ऋषभ गायकवाड 27, वेंकटेश एच 29, सार्थक ढमढेरे 28, मुकुंद बाबर 22, गणेश बाड 6-24, आदित्य दाडे 2-23, शिवेने भारद्वाज 1-6) पराभूत वि. आर्यन्स क्रिकेट अकादमी: 19.2षटकात 3बाद 173धावा(साई बोऱ्हाडे नाबाद 62(52,6×4,2×6), शिवेने भारद्वाज 41(21,6×4,2×6), वीरांश शर्मा 33, आदर्श रावळ 15, मुकुंद बाबर 1-26); सामनावीर – गणेश बाड; आर्यन्स क्रिकेट अकादमी 7 गडी राखून विजयी.

More Stories
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 409 खेळाडू सहभागी
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र, ट्रिनिटी, आर्यन्स क्रिकेट अकादमी, ॲबिशियस, पीबीसीए संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत संगम स्पोर्ट्स क्लब, सीएमएस फाल्कन्स संघांचे विजय