पुणे, 16 मे 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) आणि वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) या स्पर्धेत यंदा नव्याने समावेश करण्यात आलेल्या पुरुष गटात सातारा वॉरियर्स आणि महिला गटात पुणे वॉरियर्स या संघांच्या पहिल्या सराव सत्राचे उदघाटन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहीत पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
अथ एलिट मैदानावर पार पडलेल्या या उदघाटन समारंभास वाईन इंटरप्रिंसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि पुणे वॉरियर्स व सातारा वॉरियर्स संघाचे मालक मनप्रीत उप्पल, जीजी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सातारा वॉरियर्स संघाचे मालक गौरव गढोक, एमसीएच्या संघटनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य व ग्राउंड कमिटीचे अध्यक्ष सुशील शेवाळे, एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, गोयल गंगा समूहाचे संचालक अनुज गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंना उद्देशून एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यावेळी म्हणाले की, सातारा वॉरियर्स आणि पुणे वॉरियर्स संघाच्या फ्रँचायझी मालकांनी खेळाडूंसाठी सरावासाठी अत्यंत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडूंना त्यांनी योग्य तो मान दिला आहे. त्याबद्दल मी मनप्रीत उप्पल व गौरव गढोक यांना खेळाडू व संघटनेच्या वतीने धन्यवाद देतो. आम्ही सर्वांनी मिळून एमपीएल सुरु केली, त्यावेळी आमच्या मनात एकच हेतू होता कि, महाराष्ट्रातील खेळाडूंना उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि साऱ्या जगाने त्यांचे कौशल्य पाहिले पाहिजे.
पुणे वॉरियर्स व सातारा वॉरियर्स संघांचे फ्रँचायझी मालक हे अतिशय चांगल्या कुटुंबातील उत्तम व्यावसायिक असून त्यांनी क्रिकेटवरील प्रेमापोटी हे संघ खरेदी केले आहेत. तसेच,तुम्हाला तज्ञ प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ उपलब्ध करून दिला आहे. आता तुम्हाला हे लक्षात ठेऊन सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आयपीएलच नव्हे तर भारतीय निवड समितीचे देखील लक्ष तुमच्यावर राहणार आहे आणि त्यामुळेच तुमचे भविष्य खऱ्या अर्थाने घडणार आहे.
तुम्ही सर्व खेळाडू हे चांगल्या कुटुंबातून आणि साध्या परिस्थितीतून आलेले आहात.आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही आपले सर्वोतोपरी योगदान देणे आवश्यक आहे. तुम्ही सर्व खेळाडूंमध्ये चांगली गुणवत्ता असल्याची आम्हाला खात्री आहे. परंतु तुम्हाला हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जे मित्र लागतात ते हे फ्रँचायझी मालक आहेत. त्यांनी केलेल्या प्रचंड गुंतवणुकीतून त्यांना फायद्याची अपेक्षा नसून केवळ महाराष्ट्रातील खेळाडूंना उज्वल भवितव्य प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी हि गुंतवणूक केली आहे.
वाईन इंटरप्रिंसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि पुणे वॉरियर्स व सातारा वॉरियर्स संघाचे मालक मनप्रीत उप्पल म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) स्पर्धेत आम्ही पहिल्यांदाच संघ खरेदी केले असून गुंतवणूक दार प्रथमच पदार्पण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना फायदा व्हावा, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
जीजी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सातारा वॉरियर्स संघाचे मालक गौरव गढोक, आयपीएलच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातून गुणवान खेळाडू पुढे यावेत व त्यांची निवड आयपीएल भारतीय संघासाठी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्हांला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांचे विशेष आभार मानतो.
More Stories
दुसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे 10 मेपासून आयोजन
पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत वेकफील्ड डिलाइट्स, स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स, एचके पावरहाऊस संघांचे विजय
पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स संघाचा दुसरा विजय