April 28, 2024

शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत अधिराज दुधाने, आरव पटेल, प्रार्थना खेडकर यांचा सनसनाटी विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 20 मार्च 2024: शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे आयोजित शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अधिराज दुधाने, आरव पटेल यांनी, तर मुलींच्या गटात प्रार्थना खेडकर हिने मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरूअसलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित आरव पटेल याने अव्वल मानांकित प्रजीतरेड्डी मदिरेड्डीचा 6-3, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. बिगरमानांकीत अधिराज दुधाने याने चौथ्या मानांकित अंश रामाणीचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सर्वज्ञ सरोदेने यशवंतराजे पवारवर 6-4, 6-3 असा विजय मिळवला. नमिश हुड याने अंशुल पुजारीचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले.

मुलींच्या गटात पाचव्या मानांकित प्रार्थना खेडकर हिने अव्वल मानांकित श्रावी देवरेचा 0-6, 6-3, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
शर्मिष्ठा कोद्रे हिने ओवी मारणेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित स्वरा जावळेने आठव्या मानांकित वीरा हरपुडेचा 6-0, 4-6, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेने रितू ग्यानला 6-2, 6-1 असे नमविले. दुहेरीत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सुजय देशमुखने नमिश हुडच्या साथीत अभिनव शर्मा व रौनक सेठी यांचा 6-4, 5-7, 10-4 असा तर, प्रजीतरेड्डी मदिरेड्डी व अंशुल पुजारी या जोडीने यशवंतराजे पवार व अद्वैत गुंड यांचा 6-3, 6-1 असा पराभव केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
आरव पटेल(6) वि.वि. प्रजीतरेड्डी मदिरेड्डी(1)6-3, 6-1;
सर्वज्ञ सरोदे(3) वि.वि.यशवंतराजे पवार 6-4, 6-3;
अधिराज दुधाने वि.वि.अंश रामाणी(4)6-4, 6-2;
नमिश हुड वि.वि.अंशुल पुजारी 6-3, 7-5;

मुली:
प्रार्थना खेडकर(5)वि.वि.श्रावी देवरे(1) 0-6, 6-3, 6-4;
शर्मिष्ठा कोद्रे वि.वि.ओवी मारणे 6-1, 6-1;
जान्हवी चौगुले(3)वि.वि.रितू ग्यान 6-2, 6-1;
स्वरा जावळे(2)वि.वि.वीरा हरपुडे(8)6-0, 4-6, 6-3;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
सुजय देशमुख/नमिश हुड वि.वि.अभिनव शर्मा/रौनक सेठी 6-4, 5-7, 10-4;
प्रजीतरेड्डी मदिरेड्डी/अंशुल पुजारी(3) वि.वि.यशवंतराजे पवार/अद्वैत गुंड 6-3, 6-1;
तनिश पाटील/लक्ष्य त्रिपाठी(4)वि.वि.वेदांत जोशी/पीयूष रेड्डी 6-2, 7-5;
आरुष पोतदार/आरव पटेल(2) वि.वि.रिशव रावल/श्री चरण समिनेनी 6-1, 6-3.