April 28, 2024

शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत अवनी देसाईचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

पुणे, 19 मार्च 2024: शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे आयोजित शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत अवनी देसाई हिने चौथ्या मानांकित वैष्णवी नागोजीचा 6-3, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सारा फेंगसेचा 6-1, 6-4 असा पराभव केला. अनिका नायरने श्रेया रांजळकरचे आव्हान 6-0, 6-2 असे संपुष्टात आणले. सातव्या मानांकित मायरा टोप्नोने वान्या अग्रवालला 6-3, 6-3 असे पराभूत केले. सहाव्या मानांकित सानवी राजूने क्वालिफायर जान्हवी सावंतचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रितू ग्यान हिने सान्वी रॉयवर 6-0, 6-4 असा विजय मिळवला.

मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित प्रजीतरेड्डी मदिरेड्डी याने लव परदेशीचा 6-1, 6-2 असा तर, सहाव्या मानांकित आरव पटेलने कियान पौआचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अधिराज दुधाने याने वेदांत जोशीला 6-1, 6-3असे नमवून आपले आव्हान कायम राखले. चौथ्या मानांकित अंश रामाणीने वीर चतुरचा 3-6, 6-4, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

निकाल: मुख्य ड्रॉ: उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले:
प्रजीतरेड्डी मदिरेड्डी(1) वि.वि.लव परदेशी 6-1, 6-2;
आरव पटेल(6) वि.वि. कियान पौआ 6-2, 6-1;
सर्वज्ञ सरोदे(3) वि.वि.अझलन शेख 6-1, 6-1;
यशवंतराजे पवार वि.वि. आदित्य वाडकर 6-4, 6-3;
अधिराज दुधाने वि.वि.वेदांत जोशी 6-1, 6-3;
अंश रामाणी(4) वि.वि. वीर चतुर 3-6, 6-4, 7-5;
नीरज जोर्वेकर(7) वि.वि.अंशुल पुजारी 6-2, 6-1;
नमिश हुड वि.वि.आदिराज ब्रम्हनाथकर 6-2, 6-3;

मुली: पहिली फेरी:
श्रावी देवरे(1) वि.वि.सारा फेंगसे 6-1, 6-4;
अनिका नायर वि.वि.श्रेया रांजळकर 6-0, 6-2;
रित्सा कोंडकर वि.वि.मीरा बंगाळे 6-0, 6-0;
प्रार्थना खेडकर(5)वि.वि.देवेशी पडिया 6-0, 6-2;
अवनी देसाई वि.वि.वैष्णवी नागोजी(4)6-3, 6-4;
ओवी मारणे वि.वि.मोहक कुलकर्णी 6-2, 6-1;
शर्मिष्ठा कोद्रे वि.वि.अयाती तुडयेकर 6-2, 6-3;
मायरा टोप्नो(7) वि.वि.वान्या अग्रवाल 6-3, 6-3;
सानवी राजू(6) वि.वि.जान्हवी सावंत 6-3, 6-2;
रितू ग्यान वि.वि.सान्वी रॉय 6-0, 6-4;
आयुश्री तरंगे वि.वि.गीतिका पावसकर 6-1, 6-1;
स्वरा जावळे(2)वि.वि.ओजसी देगमवार 6-3, 6-2;