July 8, 2025

ठाकरे आणि पवार कुटुंबीयांनी स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी एकत्र यावे – राजू शेट्टी

पुणे, २२ एप्रिल २०२५: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे दोन्ही पवारांनी देखील एकत्र यावं अस सांगितलं जात आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की कोण कश्यासाठी एकत्र येत आहे त्याबाबत आम्हाला घेणंदेणं नाही. राज्याची संस्कृती अशी आहे की एकत्र भेटले म्हणजे वैचारिक परिवर्तन झालं असं होत नाही. परस्पर विरोधी माणसे देखील एकमेकांना भेटत असतात. पण स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी एकत्र आले तर चांगली गोष्ट असून त्याचं स्वागतच केलं पाहिजे अस यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज विविध मागण्याच्या संदर्भात साखर आयुक्तांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना विचारल असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी तिसऱ्या आघाडीच्या युतीबाबत शेट्टी यांना विचारल असता ते म्हणाले की ती आमची निवडणुकीसाठी झालेली युती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या साठी काम करणारी संघटना आहे. आम्ही आमच काम करत असून पुढे युती ठेवायची की नाही याबाबत विचार करू अस यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात साखर आयुक्तांची भेट घेतली आहे. एआय च वापर हे उसाच्या काट्यात देखील होणे गरजेचे आहे. कारखान्यांकडून उसाचा काटा मारला जातो आणि याच नुकसान हे शेतकऱ्यांना होत असतो. तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीत होत आहे चांगली गोष्ट असून एआय च वापर देखील उसाच्या काट्यात व्हायला पाहिजे तसेच हा हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी ही केली गेली पाहिजे. तसेच थकीत एफआरपी लवकरात लवकर मिळावी अशी आमची मागणी असल्याचं यावेळी शेट्टी म्हणाले.