June 13, 2026

व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत श्रेया भोसले, सारा साळुंके, तामिळनाडूच्या हरिणी राजा यांचे विजय

पुणे, 8 जून 2026 : पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित भारतीय बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘व्ही.व्ही. नातू मेमोरियल योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन टूर्नामेंट 2026’ (वरिष्ठ भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या श्रेया भोसले, सारा साळुंके, तामिळनाडूच्या हरिणी राजा यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रेया भोसलेने सोळाव्या मानांकित हरियाणाच्या चितवन खत्रीचा 15-5 15-4 असा तर, तामिळनाडूच्या हरिणी राजाने अकराव्या मानांकित उत्तरप्रदेशच्या आराध्या कुशवाहचा 15-12 15-11 असा पराभव करून अंतिम पात्रता फेरी गाठली. महाराष्ट्राच्या सारा साळुंके हिने एकतिसाव्या मानांकित मध्यप्रदेशच्या माही पवारचा 15-9 12-15 15-12 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या श्रुती फणसेने तेलंगणाच्या रुचिश्या रेड्डी दाराला 15-12 14-16 15-11 असे नमविले. महाराष्ट्राच्या भक्ती पाटीलने तामिळनाडूच्या जननी सुरेश कुमारचे आव्हान 15-10 15-9 असे मोडीत काढले.

निकाल: पुरुष: चौथी पात्रता फेरी:
प्रणव राम एन.(तेलंगणा)वि.वि. ओजस खन्ना (उत्तरप्रदेश) 15-7, 15-2
सैतलुआंगपुईया सायलो[18](मिझोराम)वि.वि.सुबुद्ध सेठी(कर्नाटक) 15-13 15-11
नीरज नायर पीएस(तामिळनाडू)वि.वि.वैभव जाधव(दिल्ली) 15-13 12-15 15-13
आकाश यादव(दिल्ली) वि.वि.मयुख डीबी(कर्नाटक) 18-16 9-15 15-11
हार्दिक दिव्यांश(कर्नाटक)वि.वि.वेंकट साई हर्षित तुम्माला(तेलंगणा)
15-11 7-15 15-12
साई रिशवंत लाडे वि.वि.गौरव परमार 16-14 15-13
श्रीकांत सुंदरा श्रीनिवासन(तामिळनाडू)वि.वि.विनय पाटील(महाराष्ट्र) 15-11 15-10
केविन थंगम ( तामिळनाडू)[14]वि.वि.सचित त्रिपाठी(महाराष्ट्र) 7-15 15-11 15-6
रुद्र शाही(कर्नाटक)वि.वि. तमिळ अरसन व्ही.(तामिळनाडू) 15-10 15-4
अरोमा जाहिद(उत्तराखंड)[20] वि.वि.कनक सिंघल(दिल्ली) 15-9 15-11
आशी दास(कर्नाटक)[24] वि.वि.नलिन किशोर(उत्तरप्रदेश) 15-4 15-3

मुली:
हरिणी राजा(तामिळनाडू) वि.वि.आराध्या कुशवाह[11](उत्तरप्रदेश) 15-12 15-11
इशिका पोद्दार(चंदीगढ) वि.वि.अर्शिया जैन(दिल्ली) 10-15 15-9 15-3
सारा साळुंके(महाराष्ट्र) वि.वि.माही पवार[31](मध्यप्रदेश) 15-9 12-15 15-12
श्रुती फणसे(महाराष्ट्र) वि.वि.रुचिश्या रेड्डी दारा(तेलंगणा) 15-12 14-16 15-11
श्रेया भोसले(महाराष्ट्र) वि.वि.चितवन खत्री[16] (हरियाणा) 15-5 15-4
भक्ती पाटील(महाराष्ट्र) वि.वि.जननी सुरेश कुमार(तामिळनाडू) 15-10 15-9
उर्ध्विना खडसे(गुजरात) वि.वि.यवर्ण श्यामलाराव हिमाबिंदू(चंदीगढ) 15-13 15-13
आनंदिता तामरा(राजस्थान) वि.वि.राईषा भानोत(छत्तीसगढ) 15-5 15-11
दिक्षा एस.आर.(तामिळनाडू) वि.वि.नवीन रांका(महाराष्ट्र)15-4 15-4
सिया बंग(महाराष्ट्र) वि.वि.श्रुतिका सेंथिल(तामिळनाडू) 15-10 15-12
दक्षिणी पाटील (महाराष्ट्र) वि.वि.सुझेन बुर्हागोहेन(आसाम) 15-7 15-10
हर्षिका अमर्ती(आंध्रप्रदेश) वि.वि.सान्वी दखणे(महाराष्ट्र) 15-4, 15-6
अक्षिता [28](उत्तराखंड) वि.वि.तनिका मोहन(कर्नाटक) 15-8 15-9
केतकी थिटे (महाराष्ट्र) वि.वि.गौरी वशिष्ठ(मध्यप्रदेश) 15-6 15-10
तनिषा सिंग [8] (राजस्थान) वि.वि.सिमरन गिल्होत्रा(पंजाब) 15-6 15-10