पुणे, 2 जुलै 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 96 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा बाऊन्स फिटनेस अँड स्पोर्टस क्लब येथील मैदानावर 3 ते 8 जुलै 2023 या कालावधीत रंगणार आहे.
पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे व मानद सचिव सारंग लागु म्हणाले की, या स्पर्धेत एकूण 10 संघ असून प्रत्येक संघात ९ खेळाडूंचा समावेश आहे.
अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक श्री अभिषेक ताम्हाणे म्हणाले कि खेळाडू, जे पी वाय सी क्लबचे सदस्य आहेत त्यांना ऑक्शनच्या आधाराने १० संघात विभागण्यात आले आहे. संघ पुढीलप्रमाणे एनसीएस बेंचर्स (नंदन डोंगरे), फाल्कन्स (सत्यजीत नाईक निंबाळकर), ओव्हनफ्रेश टस्कर्स(जेहान कोठारी), बी के बी युनायटेड (नकुल बेलवलकर व क्षितीज कोतवाल), विंटेज वायकिंग्ज(आशिष राठी), रावेतकर टायटन्स(अमोल रावेतकर), ब्ल्यू रॅम्प निंजाज(सिध्दार्थ गोखले), वॉरियर्स(आलोक तेलंग), सामोसा स्ट्रायकर्स(चिनार ओक) आणि एनएच ग्लाडीएटर्स (हरजित सिंग मठरू) हे 10 संघ झुंजणार आहेत. या स्पर्धेला रावेतकर ग्रुप यांनी पुरस्कृत केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असुन यामध्ये अभिषेक ताम्हाणे, सारंग लागु, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत, सिध्दार्थ दाते यांचा समावेश आहे.
More Stories
दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न
पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवात रंगली स्केटींग व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा
एआयएफएफ एलिट युथ लीग फुटबॉल: स्पोर्ट्स मॅनियाचा सलग तिसरा विजय