July 24, 2024

दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत रावेतकर टायटन्स संघाचा सलग दुसरा विजय

पुणे, 4 जुलै 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत रावेतकर टायटन्स संघाने सलग दुसरा विजय मिळवला.
बाऊन्स फिटनेस अँड स्पोर्टस क्लब येथील मैदानावर  सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ब गटाच्या सामन्यात आदित्य गांधी (24मि.) याने केलेल्या गोलाच्या जोरावर रावेतकर टायटन्स संघाने वॉरियर्स संघाचा 1-0 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.
काल रात्री उशिरा झालेल्या अन्य लढतीत फाल्कन्स संघाने ओव्हनफ्रेश टस्कर्स संघाचा 4-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. फाल्कन्स संघाकडून सार्थक ओसवाल 4मि., सत्यजीत नाईक निंबाळकर 6मि., शुभांकर भजेकर 10मि., अभिषेकजैन 22मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
ब गटात योहान खिंवसरा(28मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर वॉरियर्स संघाने निंजाज संघाचा 1-0 असा पराभव करून विजयी सुरुवात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट ब: रावेतकर टायटन्स: 1(आदित्य गांधी 24मि.) वि.वि.वॉरियर्स: 0;
गट अ: फाल्कन्स: 4(सार्थक ओसवाल 4मि., सत्यजीत नाईक निंबाळकर 6मि., शुभांकर भजेकर 10मि., अभिषेकजैन 22मि.) वि.वि.ओव्हनफ्रेश टस्कर्स: 1(रोहन ठोंबरे 15मि.);
गट ब: वॉरियर्स: 1(योहान खिंवसरा 28मि.) वि.वि. ब्ल्यू रॅम्प निंजाज: 0.