May 2, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत यार्डी, केपीआयटी उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 3 एप्रिल, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत यार्डी, केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत  उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात आशु शेख(33 धावा व 2-35) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर यार्डी संघाने इन्फी बीयु इलेव्हन संघाचा  6 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना यार्डी संघाने 20 षटकात 5बाद 197धावा केल्या. यात सौरभ देवरे 33, आशु शेख 33, हृषिकेश पटवर्धन 27, अमेय पाडे 23, प्रीतम गुजरे नाबाद 15, जीवन गोसावी नाबाद 24 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात इन्फी बीयु इलेव्हन संघाला 20 षटकात 8बाद 191धावाच करता आल्या. यात हृषीकेश खांडेकर 64, विशाल भैरमडगीकर 26, सौरभ थोरात नाबाद 25 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. यार्डी संघाकडून आशु शेख(2-35), हृषिकेश पटवर्धन(2-43), जीवन गोसावी (1-26) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 6 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात मयुरेश लिखिते 22 धावा व 4-31) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केपीआयटी संघाने इन्फोसिस संघाचा 11 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
 
निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 
यार्डी: 20 षटकात 5बाद 197धावा(सौरभ देवरे 33(30,2×4,2×6), आशु शेख 33(18,3×4,2×6), हृषिकेश पटवर्धन 27, अमेय पाडे 23, प्रीतम गुजरे नाबाद 15, जीवन गोसावी नाबाद 24, सौरभ पवार 4-35) वि.वि.इन्फी बीयु इलेव्हन: 20 षटकात 8बाद 191धावा(हृषीकेश खांडेकर 64(42,8×4,1×6), विशाल भैरमडगीकर 26, सौरभ थोरात नाबाद 25, आशु शेख 2-35, हृषिकेश पटवर्धन 2-43, जीवन गोसावी 1-26);सामनावीर-आशु शेख; यार्डी संघ 6 धावांनी विजयी;
केपीआयटी: 20 षटकात 6बाद 143धावा(सोमेश मर्दाने 40(39,4×4,1×6), अक्षय बधे 37(25,4×4,1×6), मयुरेश लिखिते 22, मंगेश पाटील 14, पिराजी रुपनूर 2-40, पियुष पवार 1-1) वि.वि.इन्फोसिस: 19.4 षटकात सर्वबाद 132धावा(तरुणकुमार राय 23, पिराजी रुपनूर 22, सागर बिरदवडे 20, मयुरेश लिखिते 4-31, संतोष कंक 2-22, आलोक नागराज 1-19); सामनावीर-मयुरेश लिखिते; केपीआयटी संघ 11 धावांनी विजयी.