May 12, 2024

आम्ही तुमचेच हे समजण्यासाठी समाजाला १३१ वर्ष लागली – श्रीगौरी सावंत (तृतीयपंथी नेत्या)

पुणे, २०/०९/२०२३: काल आमच्या नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा तृतीयपंथी नेत्या श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते पार पडली गेले दोन महिने मी सातत्याने गौरी ताईंच्या संपर्कात होतो एका तृतीयपंथी समाजाच्या व्यक्तीने प्राणप्रतिष्ठा करणे ही बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती सगळे ठरलं ताई त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन आल्या विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठा केली सत्कार स्वीकारला पण त्यांनी आपल्या अमोघ वाणीने साऱ्यांची मने जिंकून घेतली
ताई म्हणाल्या की ‘ स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की हा दिवस माझ्या आयुष्यात येईल एवढा मानसन्मान मिळेल माझ्या सारख्या सिग्नल ला टाळी वाजवून भीक मागणाऱ्या तृतीयपंथी साठी लोक टाळ्यांचा कडकडाट करतील
आम्ही समाजतील एक वाळीत टाकलेली जमात अशीच मनाची धारणा झाली होती पण तुमचे काम चांगले असले की समाजाचा पाठिंबा कसा मिळतो आणि तुम्हाला काम करण्याची ऊर्जा देऊन जातो हे कळतच नाही खरे तर लोकमान्यांनी हा उत्सव सुरू केला तोच विस्कळीत समाज एकत्र यावा या हेतूने परंतु आम्हीही समाजाचा एक भाग आहोत हे समजण्यासाठी १३१ वर्ष लागली आज मी भरून पावले’ हे बोलताना ताईंच्या डोळ्यातुन अश्रुधारा अखंड वहात होत्या आणि सर्वच जण भावुक झाले खरेतर हा दैवी संकेत होता असे मी मानतो कारण आम्ही दरवर्षी बाप्पाचे स्वागत करतो पण यंदाचा हा उत्सव हा आमच्या साठी खूप खास झाला असेच म्हणावे लागेल बापाच्या दर्शनासाठी एवढी मोठी व्यक्ती येऊन जेव्हा तुमचे कौतुक करते तेव्हा उत्सवाचे उद्दिष्ठ सार्थकी लागले असेच वाटू लागते.