May 19, 2024

युग स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटतर्फे प्रो रोल बॉल लीगची घोषणा  देशातील सर्वांत वेगवान प्रो रोल बॉल लीग

पुणे ४ जुलै २०२३:  युग स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या अग्रगण्य क्रीडा आणि मनोरंजन कंपनीने देशातील सर्वांत वेगवान आणि प्रो रोल बॉल लीगची घोषणा केली. यावेळी लोगोचेही अनावरण करण्यात आले. कंपनीने आशियाई रोल बॉल फेडरेशनकडून बौद्धिक संपदा अधिकार प्राप्त केले आहेत. या रोमांचक खेळाच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रो रोल बॉल ही रोल बॉल खेळाची पहिली आंतरराष्ट्रीय लीग बनली आहे. केवळ पुरुष खेळाडूंची ही लीग १८ दिवसांच्या भरगच्च  सामन्यांद्वारे देशभरातील क्रिडारसिकांना रोमांचक अनुभव देण्याची हमी देते. या पहिल्या हंगामात
पुणे, मुंबई, गोवा, केरळ, बंगळुरू, गुजरात, दिल्ली आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांचे प्रतिनिधित्व करणारे आठ भक्कम संघ असतील. पुण्यातील राजू दाभाडे यांनी शोधून काढलेला आणि ६० हून अधिक देशांमध्ये खेळला जाणारा, रोल बॉल हा देशी खेळ हा एक वेगवान आणि उत्साहवर्धक खेळ असून, तो रोलर स्केटिंग आणि हँडबॉलच्या कौशल्यांचा मेळ घालणारा क्रिडाप्रकार आहे. दोन संघांद्वारे खेळल्या जाणार्‍या, या खेळामध्ये खेळाडू रोलर स्केट्सवर असताना ड्रिब्लिंग, पासिंग करत चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्ट मध्ये टाकतात. हा एक वेगवान खेळ आहे,
अॅथलेटिसिझम आणि खेळातील रणनीती दोन्हीची चाचणी घेतो. पत्रकार परिषदेदरम्यान, युगा स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट अ प्रो रोल बॉलचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ मेहता, रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस चेतन भांडवलकर,  एशियन रोल बॉल फेडरेशनचे सरचिटणीस आनंद यादव, केरळ रोल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि केरळ संघाचे मालक व बीटा ग्रुपचे अध्यक्ष राजमोहन पिल्लई आणि रोल बॉलचे संस्थापक

राजू दाभाडे उपस्थित होते.  त्यांनी देशातील पहिल्या प्रो रोल बॉल लीगची माहिती दिली आणि लोगोचेही अनावरण केले. या खेळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठीची सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांची स्पष्ट केले. या लीगमधील प्रत्येक संघात दहा प्रतिभावान खेळाडू असतील, त्यात तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश अनिवार्य असेल. खेळाडूंची निवड लिलावाद्वारे केली जाईल. जिथे संघ त्यांच्या पसंतीच्या खेळाडूंसाठी बोली लावतील. निष्पक्ष आणि स्पर्धात्मक वातावरणात निवड प्रक्रिया पार पडावी यासाठी खेळाडूची प्राथमिक किंमत दीड लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

यावेळी बोलताना, प्रो रोल बॉलचे युग स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ मेहता म्हणाले, “भारतातील सर्वांत वेगवान प्रो रोल बॉल लीग सादर करताना आणि या खेळात क्रांती घडवण्याच्या या रोमांचक प्रवासाला सुरुवात करताना मला आनंद होत आहे. आशियाई रोल बॉल फेडरेशनसह आमच्या पाच वर्षांच्या भागीदारीसह बलाढ्य संघ आणि खेळाडूंसह, आम्ही या खेळाची नवी ओळख घडविण्यासाठी आणि देशातीलच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांना एक अतुलनीय अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत. प्रो रोल बॉल ही केवळ लीग नाही; हा अॅथलेटिसिझम, नवकल्पना
आणि पर्यावरणीय जाणीवेचाही उत्सव आहे. थरारक सामने आणि खेळातून होणारा सकारात्मक परिणाम यासाठी उत्सुक आहोत. ते पुढे म्हणाले, “आम्हाला वाटते, की प्रो रोल बॉलमध्ये देशात खेळल्या
जाणाऱ्या पहिल्या तीन लीगपैकी एक बनण्याची क्षमता आहे. सहभागी संघांची प्रतिभा आणि उत्‍कृष्‍टतेसाठीची आमची  बांधिलकी या लीगचा दर्जा नवीन उंचीवर नेईल. प्रो रोल बॉल लीगमधून कौशल्य, रणनीती आणि खिलाडूवृत्तीचे उच्चतम दर्शन घडेल. जे चाहत्यांना या खेळाकडे आकर्षित करेल

आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रावर ठसा उमटविणारा एक अविस्मरणीय अनुभव देईल.” पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रो रोल बॉलने लीग दरम्यान केलेल्या प्रत्येक गोलसाठी एक हजार झाडे लावण्याचे वचन दिले आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत जागरुकता वाढवणे आणि त्याबबात सकारात्मक प्रभाव पाडणे या उद्देशाने लीगने या अनोख्या उपक्रमाचा समावेश केला आहे. प्रो रोल बॉल टेलिव्हिजन आणि विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या घरी बसून आरामात या थरारक सामन्यांचा आनंद घेता येईल. हा खेळ वेगवान, अधिक आक्रमक आणि
आकर्षक बनवण्यासाठी काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा अधिक रोमांचक अनुभव घेता येईल. या उत्साहवर्धक खेळाला समर्पित प्रो रोल बॉल ही पहिली राष्ट्रीय लीग सादर
करताना आम्ही कमालीचे उत्साहित आहोत," असे चेतन भांडवलकर म्हणाले. "आमचे ध्येय रोल बॉल खेळाडूंची अफाट प्रतिभा आणि अॅथलेटिसिझमद्वारे देशभरातील चाहत्यांसाठी चित्तथरारक अनुभव देणे हे आहे, असेही ते म्हणाले. प्रो रोल बॉलने त्यातील नाविन्यपूर्णतेमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक संघात तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह दहा खेळाडूंचा समावेश असेल. ऑल-प्ले- ऑल स्ट्रक्चर असेल. प्रत्येक संघ एकमेकांना सामोरे जातील याची खात्री केली जाईल. प्रत्येक सामना ४५ मिनिटे चालेल. त्यामध्ये एक ब्रेक असेल.
परिणामी दररोज दोन रोमांचक सामने होतील. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया अ, ब आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अशा तीन

श्रेणींमध्ये विभागली जाईल. अ श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश असेल ज्यांनी गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असेल किंवा त्याच कालावधीत सलग तीन राष्ट्रीय
स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल. ब श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश असेल ज्यांनी गेल्या पाच वर्षांत सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल किंवा कोणत्याही भारतीय संघाच्या पात्रता शिबिरात भाग घेतला असेल. दोन्ही श्रेणींसाठी मूळ किमती अनुक्रमे दीड लाख रुपये आणि एक लाख रुपये आहेत. याव्यतिरिक्त, प्रत्येक संघात तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील, गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले असेल. प्रो रोल बॉलच्या वेळापत्रकात उद्घाटनापर्यंत अनेक आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये जुलैमध्ये फ्रँचायझी घोषणा आणि खेळाडूंचा लिलाव, त्यानंतर जुलैमध्ये लीगचे अधिकृत गीत याचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये संघाच्या जर्सीचे अनावरण आणि प्रत्येक संघाशी संबंधित सेलिब्रिटींच्या सहभाग असे कार्यक्रम होतील. ऑक्‍टोबरमध्‍ये, रेफ्री आणि क्रू यांना प्रशिक्षित करण्‍यासाठी शिबिरे आयोजित केली जातील. नोव्हेंबरमध्ये, १८ दिवसांच्या स्पर्धेसह प्रो रोल बॉलचा पहिले पर्व सुरू होईल. प्रो रोल बॉलने आशियाई रोल बॉल फेडरेशन आणि युगा स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट यांच्यात पाच वर्षांची भागीदारी केली आहे. यामुळे देशात या खेळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे.
युग क्रीडा आणि मनोरंजन बद्दल: युग स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट ही एक प्रमुख क्रीडा आणि मनोरंजन कंपनी आहे. ती विविध क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडापटूंना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्यासाठी कार्यरत आहे.

नावीन्य आणि प्रेक्षकांच्या वाढत्या सहभागावर लक्ष केंद्रित करून, जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.