July 24, 2024

तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशभरातून 1200 खेळाडू सहभागी

पुणे, 1 सप्टेंबर 2023: अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशभरातून 1200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे 3 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. तपन पाणिग्रही, अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार अचंता पंडित यांनी सांगितले की, ही राष्ट्रीय स्पर्धा  अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करताना संघटनेला अभिमान वाटत आहे. या स्पर्धेला एनईसीसी, वेंकीज आणि ब्रिजस्टोन यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचा आम्ही आभार मानतो.
तसेच, हि स्पर्धा 11,13,15,17, 19वर्षाखालील मुले व मुली, पुरूष व महिला, वरिष्ठ गट, 30,40,50,55 वर्षांवरील गटात होणार आहे.
स्पर्धेत 30राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला असुन यामध्ये महाराष्ट्र, आसाम, हरयाणा, चंदीगड, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पुद्दुचेरी, तेलंगणा, छत्तीसगढ, केरळ, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि मणिपूर यांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या सुवर्णपदक विजेता महाराष्ट्राचा सभ्यसाची पाणिग्रही, हरियाणाची दिव्या सतीजा, पश्चिम बंगालचा श्रीशांक सहा, उत्तराखंडचा ओमदूत सिंग, केरळची अभिरामी पीजे, ऑलिविया बॅनर्जी यांसारखे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.