October 5, 2024

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४१ इच्छुक

पुणे, १४ सप्टेंबर २०२४ ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्यासाठी ४१ जण इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पक्षाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. सर्वाधिक नऊ इच्छुक खडकवासला मतदारसंघातून आहेत. तर कसब्यातून किंवा एकमेव उमेदवाराने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनंतर शहरातील आठही विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. पक्षाकडून १० सप्टेंबर पर्यंत इच्छुकांना अर्ज पाठविण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, दिलेल्या मुदतीत ४१ जणांनी विधानसभा निवडणुक लढण्यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. संबंधित उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हे आहेत इच्छुक
हडपसर: प्रशांत जगताप, प्रवीण तुपे, योगेश ससाणे, सुनील उर्फ बंडू गायकवाड, निलेश मगर

वडगाव शेरी: रमेश आढाव, सुनील खांदवे, नीता गलांडे, अर्जुन चव्हाण, मेघा कुलकर्णी, भीमराव गलांडे, आशिष माने

शिवाजीनगर : उदय महाले, किशोर कांबळे, श्रीकांत पाटील, निलेश निकम, सुकेश पासलकर, श्रीहरी खुणे पाटील, अरुण शेलार किसन गारगोटे

खडकवासला : राहुल घुले, सुरेखा गलांडे, आशिष माने, अनिता इंगळे, काका चव्हाण, कुलदीप चळवळ, किशोर उर्फ बाळाभाऊ धनावडे, सचिन दोडके, नवनाथ पारगे, खुशाल करंजावणे

पुणे कॅन्टोन्मेंट : किशोर सरदेसाई, नितीन रोकडे, कवण चव्हाण, नरेश पकडाल्लू

पर्वती : सचिन तावरे, अश्विनी कदम, नितीन कदम, फारुक शेख
कोथरूड: किशोर कांबळे, संदीप बालवडकर, स्वप्निल दुधाने

कसबा : रवींद्र माळवदकर