May 24, 2026

पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत संगम स्पोर्ट्स क्लब, सीएमएस फाल्कन्स संघांचे विजय

पुणे, 22 मे 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत संगम स्पोर्ट्स क्लब, सीएमएस फाल्कन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला.

बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात यूकेएम कोथरूड एफसी संघाने दिएगो ज्युनियर एफसी संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. दुसऱ्या लढतीत संगम स्पोर्ट्स क्लब संघाने इंद्रायणी एससी संघाचा 3-1 असा पराभव केला. विजयी संघाकडून रक्षित पिल्लई(20मि.), लल्लावमपुईया जौटे(34मि.), सुभोध लामा(55मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

अन्य लढतीत थंडरकॅट्झ एफसी संघाने परशुरामियन्स एफसी संघाचा 2-2 असे बरोबरीत रोखले. थंडरकॅट्झ एफसी संघाकडून क्षितिज कोकाटे(22मि.), सोनू यादव(54मि.) यांनी तर, परशुरामियन्स संघाकडून मुकुंद महामुनी(12मि.), वेदांत देसाई(62मि.) यांनी गोल केला. साद शेख 3, 39 मि.) याने केलेल्या दोन गोलाच्या जोरावर सीएमएस फाल्कन्स संघाने डेक्कन इलेव्हन संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:
यूकेएम कोथरूड एफसी: 0 बरोबरी वि. दिएगो ज्युनियर एफसी: 0;

संगम स्पोर्ट्स क्लब: 3 (रक्षित पिल्लई 20मि., लल्लावमपुईया जौटे 34मि., सुभोध लामा 55 मि.) वि.वि. इंद्रायणी एससी: 1 (शेरॉन काकडे 67मि.);

थंडरकॅट्झ एफसी: 2 (क्षितिज कोकाटे 22मि., सोनू यादव 54मि.) बरोबरी वि. परशुरामियन्स एफसी: 2 (मुकुंद महामुनी 12मि., वेदांत देसाई 62 मि.);

सीएमएस फाल्कन्स: 4 (साद शेख 3, 39 मि.,, मनीष ठाकरे 52मि., अनुप नायर 60मि.) वि.वि.डेक्कन इलेव्हन: 0.