May 25, 2026

पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 409 खेळाडू सहभागी

पुणे, 25 मे 2026: शारदा स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत जिल्ह्यातून विविध वयोगटात एकुण 409 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने शारदा स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये 26 ते 31 मे 2026 दरम्यान ही स्पर्धा होत आहे.

स्पर्नीधा संयोजन सचिव आशिष बोडस यांनी सांगितले की, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धेला खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील टेबल टेनिसला अधिक चालना मिळावी आणि युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.”

स्पर्धेत शरण्या पटवर्धन, नक्ष महाजन, स्पृहा गुजर, सई कुलकर्णी, नीरज नांदेडे, दिया शिंदे, आर्यन वानखेडे, स्वरदा साने, श्रेयश माणकेश्वर, शौरेन सोमण, रुचिता दारवटकर, प्रणव घोलकर, रोहिंटन तोडीवाला, इशान खांडेकर, कौस्तुभ गिरगावकर, जय पेंडसे हे अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.

स्पर्धेत एकुण 1,13,500 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, ही स्पर्धा 11, 13, 15, 19 वर्षाखालील मुले व मुली, पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, 40वर्षांवरील, 60 वर्षांवरील गट, प्रौढ गट आणि 15 वर्षांवरील मुले दुहेरी गटात होणार आहे.

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
11 वर्षाखालील मुले: 1. नक्ष महाजन, 2. स्वयम कोठावळे, 3. आरव बापट, 4. देबयन बॅनर्जी;
11 वर्षाखालील मुली: 1. शरण्या पटवर्धन, 2. एरिना अहमद, 3. मायरा शर्मा, 4. नेत्रा होनप;

13 वर्षाखालील मुले: 1. नीरज नांदेडे, 2. वरदन कोलते, 3. नभ पांचोलिया, 4. ऋग्वेद दांडेकर, 5.तन्मय इंगवले, 6. नक्ष महाजन, 7. सर्वेश जोशी, 8. स्वयम कोठावळे;
13 वर्षाखालील मुली: 1. स्पृहा गुजर, 2. अहाना गोडबोले, 3. शरण्या पटवर्धन, 4. श्रीनिका उमेकर, 5. कार्तिकी नढे, 6. आरिहा more, 7. विधिता घाटकर, 8. एरिना अहमद;

15 वर्षाखालील मुले: 1. आर्यन वानखेडे, 2. नीरव मुळ्ये, 3. शारंग गवळी, 4. धैर्य शहा, 5. एल्विस टॉम, 6. नभ पांचोलिया, 7. सर्वेश जोशी, 8. ऋग्वेद दांडेकर;
15 वर्षाखालील मुली: 1. दिया शिंदे, 2. स्पृहा बोरगावकर, 3. श्रेया कोठारी 4. स्पृहा गुजर, 5. नीरजा देशमुख, 6. सारा गांधी, 7. अद्विता मोरे, 8. शरण्या पटवर्धन;

17 वर्षाखालील मुले: 1. श्रेयस माणकेश्वर, 2. शौरेन सोमण, 3. नील नवरे, 4. अनुज फुलसुंदर, 5. निशाद लेले, 6. स्वरूप बादलकर, 7. राज भताणे, 8. आर्यन वानखेडे;
17 वर्षाखालील मुली: 1. सई कुलकर्णी, 2. स्वरदा साने, 3. आद्या गवात्रे, 4. श्रेया गायकवाड, 5. मृदुला सुरवसे, 6. नीरजा देशमुख, 7. दिया शिंदे, 8. श्रेया कोठारी;

19 वर्षाखालील मुले: 1. प्रणव घोळकर, 2. ईशान खांडेकर, 3. कौस्तुभ गिरगावकर, 4. श्रेयस माणकेश्वर, 5. नील नवरे, 6. निशाद लेले, 7. शौरेन सोमण, 8. अनुज फुलसुंदर;
19 वर्षाखालील मुली: 1. रुचिता दारवटकर, 2. सई कुलकर्णी, 3. स्वरदा साने, 4. जान्हवी फणसे, 5. मृदुला सुरवसे, 6. आद्या गवात्रे, 7. निधी भांडारकर, 8. मेधा कोत्रा.