पुणे, १३/०२/२०२५: छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पतित पावन संघटनेच्या वतीने अभिनेता राहुल सोलापूरकरच्या कोथरूड येथील घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.त्वरित गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी ,या मागणी साठी कोथरूड पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. देशमाने यांना निवेदन देण्यात आले.हे आंदोलन १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले.दरम्यान, अशा वक्तव्यांच्या विरोधात पतित पावन संघटना आक्रमक पवित्रा घेईल,असा इशारा पतित पावन संघटनेचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी पत्रकाद्वारे दिला.
‘राहुल याने स्वतःला फालतु प्रसिध्दी मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केली. यामुळे सर्व सामान्य शिवप्रेमी तसेच आंबेडकरवादी अनुनायी यांच्या भावना दुखविल्या आहेत.पोलिसांनी जर कारवाई करण्यात कचुराई केलीत तर नाईलाजाने पोलिस स्टेशन समोर साखळी उपोषण करेल ‘असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
आंदोलनाचे वेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, राजाभाऊ पाटील, शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर,मनोज नायर,गोकुळ शेलार,पप्पु टेमघरे,अरविद परदेशी,मनोज पवार,सुनिल मराठे, माउली साठे,विजय गावडे,राजु बर्गे, शरद देशमुख,राहुल पडवळ,विनोद बागल,हराळे पाटिल,राजु नायर,अक्षय बर्गे,शुभम परदेशी, दिपक परदेशी, राम जोरी, सनी शेलार, गणेश गालींदे, प्रमोद गरूड, अनंत यादव, अनंत यादव, शौनक कटिकर आदी अनेक जण उपस्थित होते.

More Stories
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन
Pune: केदारनाथ पुरातील मृत घोषित झालेला शिवम पुण्यात सापडला; प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक पुनर्वसन