पुणे, १६ मे २०२५: फलटण येथील यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश आहे. त्यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे आणि जणांच्या नावावर बोगस कर्ज काढलेली आहे, कर्ज प्रकरण केलेली आहेत, सदरचे कर्ज थकीत आहेत सदर कर्जाचे पैसे हस्तेपरहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहे. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केला आहे. त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनीयोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केला असल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह निलेश जाधव, गणेश पवार, एस डी कुलकर्णी उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी सांगितले की यशवंत सहकार बँकेचे अनेक ठेवीदार यांच्याशी त्यांनी बोलणे केले. लोकांनी ज्या ठेवी बँकेत ठेवले होत्या ते मिळणे अशक्य झाले आहे. सदर रक्कम पाच लाखांच्या आत आहे पण दबाव ठेवीदार यांच्यावर टाकला जात आहे. “माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कर्ज बुडीत यांच्या सोबत जाऊन मी त्यांची चुकीची बाजू घेत असल्याचा आरोप केला. परंतु बँक अध्यक्ष यांनी स्वतः पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाली आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.
“१२७ कोटी रुपये कर्ज ही केवळ शेखर चरेगावकर यांच्या आणि नातेवाईक यांच्या नावाने आहे. स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर कोणते कर्ज नाही सांगणे बिनबुडाचे आहे. ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ती बुडीत दाखवून आरबीआयकडून केवळ पाच लाख रुपये ठेवीदार यांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासन यांची फसवणूक करण्यात येत आहे,” असे कुलकर्णी म्हणाल्या.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या की कोणताही कागदपत्राची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी व बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा. चुकीचे व्यक्ती नावे कर्ज घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
खा. कुलकर्णी यांनी सांगितले की बँकेच्या २३० कोटी रुपयांच्या ठेवी आहे, परंतु मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आलेले आहेत. राज्य सहकार खाते यांच्याकडे बँकेतील अनियमितता बाबत तीन अहवाल आले आहे. सहकार खात्याने मोठी अनियमितता असून कायदेशीर कारवाई अद्याप केली नाही. सहकार खाते, पोलीस खाते यांनी अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न देखील यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
“माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आहे त्यांना शेखर चरेगावकर यांचे भाऊ यांच्याकडून धमकावले जात आहे. तसेच सहकार खात्यातील अधिकारी यांच्यावर देखील दबाव टाकला जात आहे. मला देखील शांत राहा नाहीतर मागील वेळीसारखे तिकीट कापू असा इशारा शेखर चारेगावकर यांचे भाऊ शार्दुल चरेगावकर यांनी नाशिक येथील मध्यस्थ मार्फत दिला आहे,” असे देखील कुलकर्णी म्हणाल्या.
कुलकर्णी म्हणाल्या की केंद्रीय सहकार विभाग यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून सदर तक्रार करणार येणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितले. “जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण सामान्य नागरिकांचे पैसे यात लुबाडण्यात आले आहे. भाजप मधील पदाचे आडून कोणी असा गैरकारभार करत असेल तर पक्षातील वरिष्ठ त्याची गंभीर दखल घेतील.
याप्रकरणी सहकार आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे पत्र देण्याय आल्याचे देखील कुलकर्णी यांनी सांगितले. याची सखोल चौकशी करून सहकार आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा ठेवीदार आणि कर्जदार यांना घेऊन सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन