October 6, 2026

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे तरुणाची हत्यारासह चार घुसखोरी व सुरक्षारक्षक तसेच कर्तव्यावरील पोलीसांच्या सतर्कतेमुळे त्वरित ताब्यात

पुणे, २८ सप्टेंबर २०२६ : शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्वर रॉक्स’ निवासस्थानाच्या गच्चीवर २६ सप्टेंबरच्या पहाटे एक अनोळखी तरुण आढळला. सुरक्षा रक्षक आणि तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या वेळी डॉ. गोऱ्हे बाहेरगावी होत्या.

या घटनेबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, घराचा पाणीपुरवठा बंद झाल्याचे लक्षात आल्यावर सुरक्षा रक्षक पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी शिडीवर चढला. त्यावेळी त्याला गच्चीवर संबंधित तरुण दिसला. पाण्याचे कनेक्शन तोडलेले आढळले असून, पाणी बंद करण्याचा हेतु गंभिर वाटतो . उपलब्ध सीसीटीव्ही चित्रणानुसार तो पहाटे सुमारे तीन वाजता गच्चीवर गेला आणि सकाळपर्यंत तेथे होता, असे त्यांनी सांगितले.

“तो विद्यार्थी असल्याचे कागदपत्रे पोलिसांनी तपासात दिसत असले परंतु कोणाच्याही घरात हत्यारांसह कोणीही एवढा वेळ कां थांबावे यामागील हेतु तपासला जाईल ,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

संबंधित तरुणाला सोडण्यासाठी काही जणांनी पोलिसांना फोन केल्याची चर्चा कानावर आल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “पोलीस आयुक्तांनी कोणत्याही फोनचा तपासावर परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिले आहे,” असे त्या म्हणाल्या. या घटनेमागे राजकीय हेतू आहे का, हे तपासातूनच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी घरावर दगडफेक झाल्याचे तसेच धमक्यांचे प्रकार घडल्याचे सांगून निवासस्थानाच्या सुरक्षेचे नव्याने मूल्यांकन करण्याची मागणी केली. परिसरातील अंधार आणि बंद असलेल्या रस्त्यावरील दिव्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. “चोरीचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र नेमका हेतू पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होईल.