पुणे, 12 मार्च 2025: अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी यांच्या वतीने व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या सहकार्यांने आयोजित एमएसएलटीए अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हर्ष नागवानी, अहान जैन, अबीर सुखानी, मायरा शेख, सतेश्री नाईक, शौर्या पाटील, आस्मि पित्रे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एनसीएल टेनिस सेंटर आणि सीपीआर टेनिस कोर्ट, पाषाण येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित हर्ष नागवानीने आपली विजयी मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित अनय सुमंतचा 7-5, 6-4 असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित अहान जैन याने पाचव्या मानांकित अहान भट्टाचार्यचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अबीर सुखानी याने वीर गायकवाडचा टायब्रेकमध्ये 6-7(6), 6-1, 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या बिगर मानांकित विष्णू पांडेने सातव्या मानांकित छत्तीसगडच्या कुमार कौटिल्यचा 6-1, 6-0 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या मायरा शेख हिने सातव्या मानांकित आदिरा भगतचे आव्हान 6-1, 6-1 असे मोडीत काढले. चौथ्या मानांकित सतेश्री नाईकने सहाव्या मानांकित तस्मई पोहाकरचा 6-0, 6-4 असा तर, तिसऱ्या मानांकित आस्मि पित्रे हिने आठव्या मानांकित गार्गी ओकचा 6-0, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित शौर्या पाटीलने पाचव्या मानांकित सेजल जाधवचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
हर्ष नागवानी(1)(महाराष्ट्र)वि.वि.अनय सुमंत(6)(महाराष्ट्र) 7-5, 6-4;
अहान जैन(3)(महाराष्ट्र)वि.वि.अहान भट्टाचार्य(5)(महाराष्ट्र) 6-1, 6-2;
अबीर सुखानी(महाराष्ट्र) वि.वि.वीर गायकवाड(महाराष्ट्र)6-7(6), 6-1, 7-6(5);
विष्णू पांडे(महाराष्ट्र)वि.वि.कुमार कौटिल्य(7)(छत्तीसगड) 6-1, 6-0;
मुली:
मायरा शेख(1)(महाराष्ट्र)वि.वि.आदिरा भगत(7)(महाराष्ट्र) 6-1, 6-1;
सतेश्री नाईक(4)(महाराष्ट्र) वि.वि. तस्मई पोहाकर(6)(महाराष्ट्र) 6-0, 6-4;
आस्मि पित्रे(3)(महाराष्ट्र)वि.वि.गार्गी ओक(8)(महाराष्ट्र)6-0, 6-3;
शौर्या पाटील(2)(महाराष्ट्र)वि.वि.सेजल जाधव(5)(महाराष्ट्र) 6-4, 6-0;
दुहेरी: मुले:
हर्ष नागवानी/अनय सुमंत(1) वि.वि.कबीर पंचमतिया/वेदांत अग्रवाल 6-1, 6-1;
आरुष देशपांडे/कबीर बोरसे(3) वि.वि.पलाश रुचंदानी/अर्थ सानप 6-1, 6-2;
अरजित बावस्कर/स्वराज भोसले वि.वि.इथन लाहोटी/अहान जैन(3) 6-7(4), 6-3, 10-6;
वीर गायकवाड/आर्य पवार वि.वि.आदित्य उपाध्ये/विराज कुलकर्णी 7-5, 6-0;
मुली:
आस्मि पित्रे/शौर्या पाटील(1)वि.वि.वल्लभा शिंदे/सान्वी धात्रक 6-0, 6-2;
समिक्षा शेट्टी/सतेश्री नाईक(2) वि.वि.समायरा चौधरी/सान्वी गोसावी 6-4, 7-6(5);
समायरा ठाकूर/गार्गी ओक(4) वि.वि.काव्या डावखर/रिया शेट्टी 6-3, 6-3;
आदिरा भगत/सेजल जाधव(2) वि.वि.अवनी गोपीरेड्डी/अलीजा सिमरा 6-3, 7-6(4).
More Stories
एमएसएलटीए हॉटेल रवाईन अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय सिरिज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात नितीश बेलुरकर आघाडीवर
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेस आज(20 एप्रिल)पासून प्रारंभ