पुणे, 11 मार्च 2025: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने व आरसीबीसी आणि अमनोरा स्पोर्टस क्लब(द फर्न) यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत पुण्याच्या सोनू मातंग याने गौरव देशमुखचा 3-2(34-62, 17-71, 108(107)-25, 62-52, 78-15) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. विशेष म्हणजे सोनू याने सनसनाटी विजयासह तिसऱ्या फ्रेममध्ये आपल्या खेळीत 107 गुणांचा स्पर्धेतील आतापर्यंतचा हायेस्ट ब्रेक नोंदवला.
पीवायसी हिंदू जिमखाना, आरसीबीसी आणि अमनोरा स्पोर्टस क्लब(द फर्न) या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत आजपासून सुरु झालेल्या राउंड रॉबिन फेरीत लक्ष्मण रावतने शिवम अरोराचा 3-1(30-68, 66(63)-08, 69-14, 51-02) असा तर, जागतिक सिक्स स्नूकर रेड स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कमल चावला याने साद सय्यदचा 3-2(10-63, 82(56)-16, 104(104)-00, 55-68, 68-22) असा कडवा प्रतिकार केला. आरव संचेती याने गणेश जाधवचा 3-1(101-34, 53-59, 70-03, 71(49)-07) असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. रोहित रावतने कैवल्य जाधववर 3-0(81(43)-42, 76(49)-22, 75-54) असा एकतर्फी विजय मिळवला.
अमनोरा स्पोर्ट्स क्लब येथील लढतीत हिमांशू जैनने फैजल खानचा 3-1(65-54,
66-30, 57-66, 72-50) असा तर, अभिजीत मोरेने सुशील रसाळचा 3-1(56-41,
50-78, 54-31, 72-27) असा पराभव केला. सचिन बिचेने पिनाक अनापला
3-0(53-43, 52-35, 63-57) असे पराभूत केले. महेश जगदाळे याने विजय
निचानीचा 3-2(20-56, 77-36, 69-49, 01-60, 65-49) असा पराभव केला.
निकाल: राउंड रॉबिन फेरी: पीवायसी बिलियर्ड्स हॉल:
मोहम्मद हुसेन वि.वि.कनिष्क झांझारिया 3-1(76-40, 61-13, 08-60, 68-64);
तन्मय जतकर वि.वि.वैभव मालखेडे 3-2(45-67, 73-49, 79-34, 16-86, 54-06);
लक्ष्मण रावत वि.वि.शिवम अरोरा 3-1(30-68, 66(63)-08, 69-14, 51-02);
रोहित रावत वि.वि.कैवल्य जाधव 3-0(81(43)-42, 76(49)-22, 75-54);
कमल चावला वि.वि.साद सय्यद 3-2(10-63, 82(56)-16, 104(104)-00, 55-68, 68-22);
चेतन राजरवाल वि.वि.प्रशांत पवार 3-1(65-58, 90-21, 42-52, 65-25);
मोहम्मद हुसेन वि.वि.तन्मय जतकर 3-0(86-10, 80-33, 76(55)-11);
कनिष्क झांझारिया वि.वि. वैभव मालखेडे 3-0(85-32, 72-48, 62-22);
सोनू मातंग वि.वि. गौरव देशमुख 3-2(34-62, 17-71, 108(107)-25, 62-52, 78-15);
आरव संचेती वि.वि.गणेश जाधव 3-1(101-34, 53-59, 70-03, 71(49)-07)
लक्ष्मण रावत वि.वि.रोहित रावत 3-1(96(96)-00, 41-71, 86-11, 63-02);
आरसीबीसी हॉल:
पारस गुप्ता वि.वि.पीयूष कुशवा 3-2(77-14, 55-65, 17-67, 75-12, 71-16);
आरव संचेती वि.वि.गौरव देशमुख 3-2(65-18, 49-79, 29-56, 45-34, 90-35);
सोनू मातंग वि.वि.गणेश जाधव 3-0(72-30, 74-43, 92(68)-00);
रोविन डिसूझा वि.वि. सिद्धार्थ टेंबे 3-1(66-38, 46-78, 57-32, 57-47);
दिग्विजय कडीयन वि.वि.कार्तिक द्विवेदी 3-0(75-14, 69-41, 88-39);
अमनोरा स्पोर्ट्स क्लब:
हिमांशू जैन वि.वि.फैजल खान 3-1(65-54, 66-30, 57-66, 72-50);
अभिजीत मोरे वि.वि.सुशील रसाळ 3-1(56-41, 50-78, 54-31, 72-27);
सचिन बिचे वि.वि.पिनाक अनाप 3-0(53-43, 52-35, 63-57);
महेश जगदाळे वि.वि.विजय निचानी 3-2(20-56, 77-36, 69-49, 01-60, 65-49);
राहुल नारंग वि.वि.रोहन कोठारे 3-2(50-44, 68-45, 17-73, 52-63, 52-50);
फैजल खान वि.वि.सुशील रसाळ 3-0(69-47, 75(75)-19, 86(52)-32;
More Stories
एमएसएलटीए हॉटेल रवाईन अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय सिरिज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात नितीश बेलुरकर आघाडीवर
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेस आज(20 एप्रिल)पासून प्रारंभ