October 5, 2024

पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान

पुणे, २ आॅक्टोबर २०२४: विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेले आहे. याचा प्रत्यय पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात येत आहे. भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यामध्ये पोस्टरवर भडकले असून दोघांनीही एकमेकांना आव्हान देणारी भाषा केलेली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पुणे शहरात भाजपतर्फे कसब्यासह कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा विधानसभा मतदारसंघाच्या जागा लढविण्याची शक्यता आहे. तर हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जाणार आहे. दरम्यान कसबा मतदार संघात सध्या काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे आव्हान भाजप पुढे आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर यांनी रासने यांचा सुमारे अकरा हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कसबा कोण जिंकणार याकडे लक्ष लागलेले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कसबा मतदारसंघातून सुमारे १५ हजार मतांची बढत मिळाली. त्यामुळे रासने-घाटे यांच्यासह कुणाल टिळक यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या तिघांनी उमेदवारी मिळावी यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे.

प्रदेश स्तरावरच्या नेत्यांना भेटून उमेदवारी मिळण्यासाठी दावेदारी केलेली आहे. मंगळवारी शहरांमध्ये कसब्यातील योग्य उमेदवार कोण याचे चाचणी पदाधिकाऱ्यांना मार्फत करण्यात आली. त्यामध्ये या तिघांनीही शक्ती प्रदर्शन केले असे असताना आता शहरात लागलेल्या पोस्टरमुळे आणखीन विचार त्याचा विषय झालेला आहे.

हेमंत रासने यांनी
‘एक कॉल समस्या सॉल,
हम है तयार,

असे पोस्टर लावलेले आहेत. तर शहराध्यक्ष घाटे यांनी त्याला प्रत्युत्तर देणारे ‘लगा लो दम आ रहे है हम’ असे पोस्टर लावले आहेत. दोन मोठ्या नेत्यांमध्ये अशा प्रकारे पोस्टर वर झाल्यामुळे कार्यकर्ते देखील बुचकुळ्यात पडले आहेत. नेमकी भूमिका कोणती घ्यायची असा प्रश्न पडलेला आहे. तसेच या दोघांपैकी एकाला उमेदवारी जाहीर झाल्यास पक्षांतर्गत वाद-विवाद वाढू नयेत यासाठी देखील काळजी घ्यावी लागणार आहे.