पुणे, 16 नोव्हेंबर 2023 ः पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्ये याने 17 वर्षांखालील मिश्र गट, पुरुष एकेरी व खुल्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला. खुल्या दुहेरी गटात उपेंद्र मुळ्ये व नील मुळ्ये यांनी विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पुरुष एकेरीत अंतिम लढतीत पाचव्या मानांकित नील मुळ्येने अव्वल मानांकित शौनक शिंदेचा 11/6,4/11,12/14,11/6,11/4,15/
17 वर्षांखालील मिश्र गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नील मुळ्येने तिसऱ्या मानांकित शौरेन सोमणचा 10/12,11/5,11/3,12/10 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकविले.
खुल्या दुहेरी गटात अंतिम फेरीत उपेंद्र मुळ्ये व नील मुळ्ये या जोडीने शौनक शिंदे व श्रीयश भोसले यांचा 8/11,11/7,15/13,11/1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 39 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित ओंकार जोगयाने दुसऱ्या मानांकित संतोष वक्राडकरचा 6/11,11/5,7/11,17/ 15,11/8
असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्षा स्मिता बोडस, रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष अजित गळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष दिपक हळदणकर, अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर, अश्र्विन हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पुरुष एकेरी: उपांत्य फेरी:
नील मुळ्ये[5] वि.वि.रजत कदम[9] 11/8,11/8,13/15,12/10;
शौनक शिंदे[11]वि.वि.शुभंकर रानडे[14]6/11,11/8,11/8,5/11,
अंतिम फेरी: नील मुळ्ये[5]वि.वि.शौनक शिंदे[11] 11/6,4/11,12/14,11/6,11/4,15/
17 वर्षांखालील मिश्र गट: अंतिम फेरी:
नील मुळ्ये[1]वि.वि.शौरेन सोमण[3] 10/12,11/5,11/3,12/10;
खुला दुहेरी गट: उपांत्य फेरी:
उपेंद्र मुळ्ये / नील मुळ्ये[5]वि.वि.जय पेंडसे / प्रणव घोळकर[1] 11/8,11/3,11/5;
शौनक शिंदे / श्रीयश भोसले[6]वि.वि.भार्गव चक्रदेव / अर्चन आपटे[2] 11/6,12/10,3/11,6/11,11/9;
अंतिम फेरी: उपेंद्र मुळ्ये / नील मुळ्ये[5]वि.वि.शौनक शिंदे/श्रीयश भोसले(PNA)[6] 8/11,11/7,15/13,11/1;
39 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
ओंकार जोग[1]वि.वि.रोहित चौधरी[5]9/11,11/7,11/9,11/9;
संतोष वक्राडकर[2]वि.वि.दिपक कदम[3] 4/11,11/8,11/8,12/10;
ओंकार जोग[1]वि.वि.रोहित चौधरी[5]9/11,11/7,11/9,11/9;
संतोष वक्राडकर[2]वि.वि.दिपक कदम[3] 4/11,11/8,11/8,12/10;
अंतिम फेरी: ओंकार जोग[1]वि.वि. संतोष वक्राडकर[2]6/11,11/5,7/11,17/ 15,11/8
More Stories
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून