पुणे, 02 मार्च 2023: पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 20 हजार 537 लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले व त्यांच्याकडून 1कोटी 73 लाख रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला. तसेच 6843 जणांना अनियमित प्रवासासाठी 40 लाख रुपयांहून जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 171 जणांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांचेकडून जारी प्रेस रिलीजच्या अनुसार या वर्षी एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांत 3 लाख 12 हज़ार 159 केसेस मध्ये 22 कोटी 52 लाखांहून अधिक दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दु दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकां द्वारे करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

More Stories
खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला
नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे योगदान: विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील
अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन