पुणे, १५ सप्टेंबर २०२३: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध (मुलींची) यांच्यामार्फत ‘रन फॉर स्किल’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग ब्रेमेन चौक ते राजभवन व परत ब्रेमेन चौक असा नियोजित असून मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे २०० ते २५० प्रशिक्षणार्थी व १० शिल्प संचालक (निदेशक) सहभाग घेणार आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य आय. आर. भिलेगांवकर यांनी दिली आहे.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ