पुणे, १६/०९/२०२३: हडपसर परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा इडुलस खत असे ११ लाख ८८ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
या प्रकरणी फिलिप विलिवन इडिली (वय ४९, सध्या रा. ऊरळी देवाची, हडपसर- सासवड रस्ता) आणि त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.
इडिली मूळचा नायजेरियाचा आहे. तो आणि त्याची मैत्रिण ऊरळी देवाची परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. दोघेजण अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी प्रवीण उत्तेकर आणि पांडुरंग पवार यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा ईडुलस खत असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाउल, पारपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोज साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.
More Stories
पुणे महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार