December 14, 2024

पुणे: मुलींची छेडछाड करणाऱ्याला हत्यारासह केले जेरबंद, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी

पुणे, दि. १८/०७/२०२३: मुलींची छेडछाड करणाऱ्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने हत्यारासह जेरबंद केले. ही घटना नुकतीच चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. आदित्य ऊर्फ बकासुर अविनाश मोरजकर, वय- १९ वर्षे, रा. होमी बाभा हॉस्पिटल जवळ, वडार वाडी, शिवाजीनगर, असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, प्रदीप राठोड यांना सराईत आरोपीची माहिती मिळाली.

गुन्हा दाखल झालेपासुन फरार असुन तो पसार झाला होता. जनसेवा चौक, जनवाडी, क्षितिज सोसायटीचे समोरील सार्वजनिक रोडच्या कडेला घोडाबग्गीचे पाठीमागील बाजुस तो उभा असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानंतर स्टाफ घटनास्थळी जावुन पाहणी करून त्याला ताब्यात घेतले ,त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेजवळ लोखंडी हत्यार मिळुन आला. विश्वासात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याबाबत पुन्हा चौकशी करता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी. सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक इंदलकर, उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे, आजीनाथ येडे यांनी केली आहे.