June 24, 2024

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द

पुणे, ८जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सातव्या दिवशी रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आज(९ जुन रोजी)सकाळी १०.३० वाजता हा सामना दोन्ही संघात प्रत्येकी ५ षटकांचा होणार आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघ गुणतालिकेत ४विजयासह अव्वल स्थानी आहे. तर, ईगल नाशिक टायटन्स संघ २विजय व १ पराभवासह चौथ्या स्थानी आहे. आज, ९ जुन रोजी दुपारी वाजता पहिला सामना ४एस पुणेरी बाप्पा वि. छत्रपती संभाजी किंग्स यांच्यात तर, सायंकाळी दुसरा सामना ईगल नाशिक टायटन्स वि. रायगस रॉयल्स यांच्यात होणार आहे.