December 13, 2024

जीएसटी अँड कस्टम्स, मध्या रेल्वे उपांत्य फेरीत

पुणे 30 जून 2023 – जीएसटी अँड कस्टम्स, पुणे आणि मध्या रेल्वे संघांनी डॉ. आंबेडकर निमंत्रित हॉकी मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात आज तलेब शाह च्या पाच गोलच्या जोरावर जीएसटी अँड कस्टम्स संघाने हॉकी लवर्स संघाचा 8-0 असा पराभव केला. हरीश शिंडगी, धरामविर यादव, प्रणव माने यांनी अन्य goal केले. विश्रांतीला जीएसटी अँड कस्टम्स संघाकडे 2-0 आघाडी होती.
अन्य एका सामन्यात मध्य रेल्वे संघाने किड्स संघाचा 12-0 असा पराभव केला. विनीत कांबळे ने चार, आदित्य रसाळ ने तीन,  तरूष सिंग ने दोन आणि गोविंद नाग, स्टीफन स्वामी, रूबेन केसरीने प्रत्येकी एक गोल केला. विश्रांतीला मध्य रेल्वेने 7-0 अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल जवळ जवळ निश्चित केला होता.