पुणे, २८ आॅगस्ट २०२४ः पुणे शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला असताना त्यांचा प्रतिबंध करताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे मात्र दुसरीकडे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून शहरात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या कारणात्सव २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले. मात्र, यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद पडले आहेत. हे सीसीटीव्ही महापालिकेने बसविलेले असले तरी त्याचे नियंत्रण पोलिसांकडे आहे. त्यामुळे या निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च करणार कोण याबाबत स्पष्टता नसल्याने ते बंदच आहेत.
शहरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुणे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला. या सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवरही नियंत्रण ठेवणे शक्य झाले, अनेक गुन्ह्यांचा छडा या सीसीटीव्हींमुळे लागला आहे. तसेच अपघात झाल्यानंतरही त्याचा वापर करता आला. गेल्या काही वर्षात नगरसेवकांनी त्यांच्या स यादीतून प्रभागात सीसीटीव्ही बसवून घेतले, त्यानंतर त्याचे नियंत्रण संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौकीमध्ये देण्यात आले.
विद्युत विभागाने शहरात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले आहेत. यापैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. तर १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद आहेत. शहरात कोयता गँगचे हल्ले, खून, मारामाऱ्या, घरफोड्या असे प्रकार वारंवार घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. असे असताना एक हजारापेक्षा जास्त सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्यासारखेच आहे.
पोलिस चौकी आणि बंद सीसीटीव्हींची संख्या
संभाजी पोलिस चौकी -३०
नारायणपेठ – २७
शनिवार पेठ -३५
खडक -३९
सेनादत्त-३४
मंडई -३८
मीठगंज-१३
पेरूगेट -२६
सहकारनगर -२४
महर्षीनगर – ७१
मार्केटयार्ड – ४२
वानवडी बाजार -२१
घोरपडी- ९, विश्रांतवाडी – ७
समर्थ पोलिस ठाणे १३९,
गाडीतळ- १८
कसबा पेठ -३३
जनवाडी – ४०
अलंकार -८
कर्वेनगर – ७१
डहाणूकर – १५
हॅपी कॉलनी – ६
ताडीवाला रस्ता- ७०
कोंढवा – ४९
अप्पर इंदिरानगर – १००
रामोशी गेट -२
काशेवाडी- ४
पेरुगेट -२
सहकारनगर – ५
सहकारनगर तळजाई-३
पर्वती दर्शन – ४
लक्ष्मीनगर – ४
वानवडी बाजार – २
तुकाई दर्शन – ६
कोरेगाव पार्क -२
विश्रांतवाडी- ४
कसबा पेठ – ८
शिवाजीनगर पोलिस ठाणे- ४
शिवाजीनगर चौकी -५
पांडवनगर- ९
जनवाडी-४
कोथरूड पोलिस ठाणे -९
कर्वेनगर – २
कोट
महापालिकेकडून सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याचे नियंत्रण स्थानिक पोलिसांकडे दिले जाते. आत्तापर्यंत महापालिकेने २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले असूनु, त्यापैकी १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद आहेत.
मनिषा शेकटकर, अधिक्षक अभियंता, विद्युत विभाग
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान