July 22, 2024

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने ड्रोन वापरावर बंदी

पुणे, 11 जुलै 2023: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पूर्व परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरणास मनाई असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेशित केले आहे.

कोणतीही व्यक्ती, संस्था, आयोजक यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करता येणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.