पुणे, २१ मे २०२५: जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले.
आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस दलाने सलामी, शोकशस्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

More Stories
पुणे ः मुंढवा जमीन व्यवहारावरून अंजली दमानिया आक्रमक; “सरकारने व्यवहार रद्द केला तर न्यायालयात जाईन”
पुणे ः बिबट्यांचे हल्ले ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्याचा प्रस्ताव; बिबट्यांना शेड्यूल-१ मधून वगळण्याचे निर्देश — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यंदाची ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ७ डिसेंबरला; पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात मात्र बदल