पुणे, २१ मे २०२५: पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे येत्या ३१ मे राेजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे रिक्त होत असलेल्या पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडुन ३१ मे रोजी नवल किशोर राम हे पदभार स्विकारणार आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील २००८ या बॅचचे नवल किशोर राम हे (आयएएस) अधिकारी आहेत. नवल किशोर राम मूळचे बिहार मधील असून २००७ मध्ये ते भारतीय शासकीय सेवेत दाखल झाले होते. आयएएस बनल्यानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग नांदेड मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनतर बीड आणि संभाजीनगर जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. संभाजीनगर मधील कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले होते. पुणे जिल्हाधिकारी म्हणुन त्यांनी काम केल आहे. कोरोना काळात ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून ते राज्यसरकारकडे रूजू झाले आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले हे येत्या ३१ मे रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेेचे आयुक्त पद रिक्त होत आहे. त्यामुळे नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडुन ३१ मे रोजी नवल किशोर राम यांनी पदभार स्विकारावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार