पुणे, ६ नोव्हेंबर २०२४: उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत आमचं सरकार येऊ द्या या सरकारच्या सर्व योजना बंद करू असे सांगितले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेजी तुमच्या आणि आमच्यात राजकीय शत्रुत्व असेल, पण त्याचा सूड महिलांवर काढू नका. आमच्या लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयांवर डोळा ठेवू नका, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.
पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी फडणवीस बोलत होते. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार मिसाळ, अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, प्रवीण चोरबेले, दीपक मिसाळ आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, आम्ही मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली, त्यातून एक लाख रुपये त्या मुलीला अठरा वर्षाची झाल्यानंतर मिळतील. महिलांना एसटी बस सवलतीमध्ये ५० टक्के सूट दिली. मुलींचे उच्च शिक्षण मोफत केले. लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिन्याला महिन्याच्या बँकेच्या पंधराशे रुपये जमा होत आहेत. ही योजना होणारच नाही बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत अशी टीका विरोध करत होते पण अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे विरोधकांची तोंड छोटी झाली. महिलांचे सावत्र भाऊ महाविकास आघाडीच्या नावाने तुमच्या योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले, तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्यासाठी लढलो आणि योजना बंद करू दिले नाही. भविष्यात देखील ही योजना बंद होतील जाणार नाही.
गतिमान सरकारचा महाराष्ट्राला फायदा
पुण्यातील प्रचाराचा नारळ पर्वती मतदारसंघातून फोडायचा हे मी निश्चित केले. यावेळी या ठिकाणावरून मिसाळ प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असे सांगत फडणवीस म्हणाले, एसआरएची नियमावाली तयार करून घेण्यामध्ये मिसाळ यांचा महत्त्वाचा वाट आहे. यामुळे येत्या काळात २० हजार घरे या भागात तयार होतील. त्याचप्रमाणे पूरग्रस्त वसाहतींना ६० वर्षानंतर घराची मालकी मिळाली यासाठी देखील मिसळ यांनी पाठपुरावा केला. पुण्यामध्ये मेट्रो खूप आधीच मेट्रो सुरु होणे अपेक्षित होते. पण काँग्रेस आघाडीचे सरकार असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्याची मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्वारगेट- कात्रज मेट्रोला मंजूरी दिली. खडकवासला खराडी मेट्रोला एका आठवड्यात राज्य सरकारने मंजूरी दिली. आपले सरकार गतिमान आहे, त्याचा फायदा पुणेकरांना होईल.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.